Shani Dev : शनिच्या साडेसातीमुळे कोणत्या राशी पीडित? शनिवारी करा 'हा' उपाय
Shani Dev : शनि सर्वांना त्रास देतो असं अजिबात नाही. शनि कुंडलीत शुभ, अशुभ आणि विशेष परिस्थितीतच त्रास देतो. परंतु, काही उपाय केल्यावर शनीचा हा त्रास देखील दूर होतो अशी श्रद्धा आहे.
Shani Dev : शनिदेवाला क्रूर ग्रह मानले जाते. असे म्हटले जाते की शनि कोणावरही दया दाखवत नाही. यामुळेच शनिचे नाव घेताच लोक घाबरतात, पण शनि सर्वांना त्रास देतो असं अजिबात नाही. शनि कुंडलीत शुभ, अशुभ आणि विशेष परिस्थितीतच त्रास देतो.
शनीची साडेसती
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनीची हालचाल सर्वात मंद असल्याचे म्हटले जाते. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. दुसरीकडे, जर आपण शनीच्या महादशाबद्दल बोललो तर ती 19 वर्षे आहे. या अवस्थांमध्ये शनि अडथळे, संकटे देतो, ज्यामुळे व्यक्तीचे जीवन विस्कळीत होते.
शनिचे शुभ फल
शनि नेहमी वाईट परिणाम देत नाही. जर कुंडलीत शनी एखाद्या शुभ स्थानावर बसला असेल आणि व्यक्ती नियम व शिस्तीचे पालन करत असेल. जर त्याने चांगुलपणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला तर शनि त्याला कधीही त्रास देत नाही.
कोणते लोक शनिमुळे त्रासलेले असतात
जे लोक चांगले कर्म करत नाहीत त्यांना शनि खूप त्रास देतो. पदाचा आणि पैशाचा दुरुपयोग, श्रीमंत होऊनही दुर्बलांना मदत न करणे, अशा लोकांना शनी त्रास देतो.
कोणत्या राशीवर शनीचा प्रभाव असतो
सध्या मिथुन, तुला राशीवर शनीचा प्रभाव आहे. धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीची साडेसाती चालू आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या राशींनी काही महत्वाचे उपाय करा.
शनिवारी शनिदेवाची पूजा करा.
शनि मंदिरात शनीला तेल अर्पण करा.
गरीब लोकांना दान करा.
निसर्गाची सेवा करा.
प्राण्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करा. त्यांना इजा करू नका.
नियम मोडू नका.
शिस्त पाळा.
गरजू लोकांप्रती सेवेची भावना ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
Geeta Gyan: 'या' लोकांना येतो सर्वात जास्त राग, श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्या 'या' गोष्टी