एक्स्प्लोर

Shani Dev : कुंभ राशीत शनीची वक्री चाल! 'या' 4 राशीच्या लोकांवर असेल शनीची कृपा; शिक्षण, नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध

Shani Dev : शनीची वक्री चाल शुभ नसते असं म्हणतात. पण, शनीच्या या वक्री चालीमुळे चार राशींच्या लोकांच्या जीवनात काही शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात.

Shani Dev : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, शनीच्या वक्री (Shani Dev) चालीमुळे नेहमीच राशींवर नकारात्मक प्रभाव होतात. लोकांच्या जीवनात शुभ गोष्टी घडत नाहीत. शनीची वक्री चाल शुभ नसते असं म्हणतात. पण, शनीच्या (Lord Shani) या वक्री चालीमुळे चार राशींच्या लोकांच्या जीवनात काही शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. शनीच्या उलट्या चालीने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळू शकते. शनीच्या वक्री चालीने कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळणार आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

कुंभ राशीत शनीच्या वक्री चालीमुळे मेष राशीच्या लोकांना याचे शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची प्रगती होऊन तुम्हाला विविध कंपन्यांकडून विचारणा होईल. नवीन ऑर्डर्स मिळतील. तसेच, जे लोक नोकरी करतात त्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. या दरम्यान तुम्हाला मानसिक शांती मिळेल, तसेच उत्पन्नातही वाढ होईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शनीच्या वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना देखील शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. यामध्ये अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. किंवा तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या बिघडलेल्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला काही सकारात्मक बातमी ऐकायला मिळू शकते. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीवर शनीच्या वक्री चालीमुळे शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. तुम्हाल जर नवीन काम सुरु करायचं असेल तर त्यासाठी ही शुभ वेळ आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायात प्रगती करण्याची ही चांगली संधी आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

कुंभ राशीत शनीच्या होणाऱ्या उलट्या चालीमुळे तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळू शकते. तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी हा काळ चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. शनीच्या कृपेने तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा होईल. 

शनीचे उपाय 

तुमच्या जीवनात जर शनीचा अशुभ प्रभाव असेल किंवा शनीची स्थिती कमजोर असेल तर शनिवारी उपवास करावा. शनिदेवाची विधीपूर्वक पूजा करावी. शमीच्या झाडाची सेवा करा. तसेच, गरजूंना मोहरीचे तेल, काळे मीठ, काळे उडीद, काळे घोंगडे, लोखंडी भांडी यांसारख्या गोष्टी दान कराव्यात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Sankashti Chaturthi 2024 : आज हिंदू नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी; जाणून घ्या पूजा, विधी आणि या दिनाचं महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Embed widget