Shani Dev : 2025 वर्षात 'या' 3 राशींवर असणार शनीची ढैय्या आणि साडेसाती; तर 'या' राशींना मिळणार साडेसातीपासून मुक्ती
Shani Dev : शनीच्या राशी परिवर्तनाने तीन राशीच्या लोकांना शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळेल. तर, तीन राशींवर शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरु होईल.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायादेवता शनीने (Shani Dev) 15 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीत शनीची मार्गी (Shani Margi) चाल केली. या आधी शनी तब्बल 30 वर्ष कुंभ राशीत विराजमान होते. आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये शनी (Lord Shani) राशी परिवर्तन करणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनाने तीन राशीच्या लोकांना शनीच्या साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळेल. तर, तीन राशींवर शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरु होईल. तर, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
'या' राशींवर सुरु होणार तसेच संपणार शनीची ढैय्या आणि साडेसाती
शनी 2025 मध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे मकर, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच, सध्या कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे 2025 मध्ये या राशींना देखील साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तर, सिंह आणि धनु राशीत शनीची ढैय्या सुरु होईल. शनीच्या ढैय्या चाल अडीच वर्षांची असते त्यामुळे सिंह आणि धनु राशीला पुढच्या वर्षी देखील शनीच्या ढैय्याचा सामना करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. मेष राशीवर शनीची साडेसाती सुरु होईल. या व्यतिरिक्त मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु असेल.
शनीच्या ढैय्या आणि साडेसातीमध्ये काय करावं?
ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होणार आहे. अशा राशीच्या लोकांना या काळात खूप मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच, शिस्तीचं पालन करावं. या काळात तुम्ही कोणतंच कठीण काम करु नये. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी व्हावं. तसेच, कोणतंही काम शॉर्टकटमध्ये करु नये. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या माहीत असायला हव्यात. आपल्याला माहीतच आहे की, शनीला प्रामाणिक, शिस्तप्रिय असे लोक जास्त आवडतात. त्यामुळे या शिस्तीचं पालन करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :