Shani Dev : पुढचे 85 दिवस 'या' 3 राशींवर होणार सुखाचा वर्षाव आणि संपत्तीची बरकत; शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने बदलेल नशीब
Shani Dev : 26 डिसेंबरपर्यंत शनी राहुच्या शतभिषा नक्षत्रात विराजमान असणार आहे. शनीचं नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक मानलं जाणार आहे.
Shani Dev : आपल्या सर्वांनाच माहित आहे की, शनी (Shani Dev) देव ठराविक वेळाने आपली चाल बदलतात. त्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर पडतो. शनीच्या (Lord Shani) नक्षत्र परिवर्तनाचा शुभ आणि अशुभ असा दोन्ही प्रकारे प्रभाव पडतो. शनी पुढच्या दोन महिन्यात आपली चाल बदलणार आहे. सध्या शनी गुरुच्या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. तसेच, लवकरच राहुच्या नक्षत्रात परिवर्तन करणार आहे,
26 डिसेंबरपर्यंत शनी राहुच्या शतभिषा नक्षत्रात विराजमान असणार आहे. शनीचं नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक मानलं जाणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
शनीचं शतभिषा नक्षत्रात परिवर्तन
ज्योतिष शास्त्रानुसार, शतभिषा नक्षत्राला 24 वं नक्षत्र मानण्यात आलं आहे. हे नक्षत्र कुंभ राशीच्या अंतर्गत येतं. या नक्षत्राला शततारा नक्षत्राच्या नावाने देखील ओळखलं जातं. त्यामुळे याचं महत्त्व फार वाढलं आहे.
मेष रास (Aries Horoscope)
शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुम्हाला व्यापार किंवा करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमची तब्येत हळूहळू सुधारेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने धनु राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फार लाभदायक असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन योजना आखत असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला व्यवसायात चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, या दरम्यान तुमचं आरोग्य देखील चांगलं असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना नक्षत्र परिवर्तनाचा चांगलाच लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत चांगला लाभ होईल. दिवसेंदिवस तुमची प्रगती होत जाईल. तसेच, तुम्ही करत असलेल्या व्यापारात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा तुम्ही करत असलेल्या कामात चांगला पाठिंबा असेल. तसेच, तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)