Shani Dev : शनीच्या मार्गीने 'या' 4 राशींवर होणार संकटांचा भडिमार; शिक्षण-नोकरी आणि व्यवसायातही व्हाल कंगाल
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत मार्गी होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत मार्गी होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यास अडीच वर्षांचा कालावधी लागतो तर एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालवधी लागतो. त्यामुळे शनीच्या ढैय्या, साडेसातीचा परिणाम दीर्घकाळ असल्याने अनेक राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक असतो. आता शनीची मार्गी झाल्यानंतर कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) पुढच्या पाच महिन्यांपर्यंत संकटांचा सामना करावा लागणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनी मार्गी झाल्याने मेष राशीच्या लोकांवर शनीची तिसरी दृष्टी असेल. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार परिश्रम करावे लागतील. अनेकजण तुमच्या कार्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करु शकतात. तसचे, तुमची लव्ह लाईफदेखील तणावाची असेल.कोणताही निर्णय घेताना सांभाळून आणि नीट विचारपूर्वक घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांवर आधीच शनीची ढैय्या सुरु असल्या कारणाने या राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना देखील व्यवसायात फारसा लाभ मिळणार नाही. तुम्ही ऑर्डरच्या शोधात असाल. तुमचं आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण पाहायला मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीच्या मार्गीचा सिंह राशीवरही परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण जास्त असल्या कारणाने तुम्हाला थकवा जाणवेल. तसेच, या काळात तुमच्या विरोधकांपासून दूर राहा. ते तुमच्या कार्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करतील. बिझनेसमध्ये तुम्हाला तोटा जाणवेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु असल्यामुळे या राशीच्या लोकांवर संकटांचा भडिमार होऊ शकतो. एका मागोमाग तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागेल. तसेच, व्यवसायात तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या तब्येतीशी संबंधित अनेक चढ-उतारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :