Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर शनी-बुध जुळून आणणार त्रि-एकादश योग; 'या' 3 राशींना नवीन वर्षात मिळणार 'गुडलक'
Shani Dev : शनी आणि बुध ग्रह 19 जानेवारी रोजी त्रि-एकादश योग जुळून आणणार आहेत. दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे त्याला त्रि-एकादश योग म्हणतात.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह यांच्या संयोगाने जानेवारी 2025 मध्ये एक चांगला योग जुळून आणणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार लाभदायक ठरु शकते. हा योग 30 वर्षांपूर्वी जुळून आला होता.
खरंतर, शनी आणि बुध ग्रह 19 जानेवारी रोजी त्रि-एकादश योग जुळून आणणार आहेत. दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे त्याला त्रि-एकादश योग म्हणतात. शनी-बुधचा योग कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरेल ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
बुध आणि शनीच्या त्रि-एकादश योग हा नवव्या आणि एकादश चरणात असणार आहे. या ग्रहांमुळे तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात चांगले बदल दिसून येतील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तसेच, तुमच्या बुद्धीचा विकास होईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमची चांगली प्रगती होऊ शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
त्रि-एकादश योग जुळून आल्यामुळे मकर राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. 2024 वर्षात तुमच्या ज्या काही योजना पूर्ण झाल्या नाहीत त्या नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. घरात सुरु असलेले वाद हळूहळू मिटतील. तसेच, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासात कल जास्त वाढलेला दिसेल. या काळात तुम्ही यात्रेला जाण्याचा प्लॅन करु शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनी ही कुंभची स्वराशी आहे. या राशीच्या लोकांना शुभ योगाचा चांगला लाभ मिळेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्या तु्म्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :