(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनिवारी 'या' 10 गोष्टी चुकूनही करू नका, तर 'या' गोष्टी करा, शनिदेवांची कृपा कायम राहील!
Shani Dev : असे म्हणतात की, ज्याच्या पत्रिकेत शनि चांगला असेल त्याला राजेशाही सुख मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी कोणती कामे करू नयेत? जाणून घेऊया
Shani Dev : शनिवार (Saturday) हा दिवस खास आहे. हा दिवस भगवान भैरव आणि शनीचा दिवस आहे. सर्व दु:ख आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवार हा महत्वाचा समजला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात चांगल्या कर्माचे फळ देणारा आणि वाईट कर्मांची शिक्षा देणारा शनि आहे. असे म्हणतात की, ज्याच्या पत्रिकेत शनि चांगला असेल त्याला राजेशाही सुख मिळते. जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी कोणती कामे करू नयेत?
ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी 'या' गोष्टी करू नका
-शनिवारी दारू पिणे सर्वात धोकादायक मानले जाते. असे करणे तुमच्या चांगल्या आयुष्यात वादळ आणू शकते.
-पूर्व, उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेने प्रवास करण्यास मनाई आहे. विशेषत: पूर्व दिशेला आवश्यक असल्यास प्रवास करा.
-शनिवारी मुलीला सासरी पाठवू नये.
-शनिवारी तेल, लाकूड, कोळसा, मीठ, लोखंड किंवा लोखंडाची वस्तू खरेदी करू नये किंवा आणू नये, अन्यथा अनावश्यक अडथळे निर्माण होतील, त्रास सहन करावा लागेल.
-या दिवशी केस कापणे किंवा नखे कापणे हे देखील निषिद्ध मानले जाते.
-या दिवशी मीठ, तेल, चामड्याच्या वस्तू, काळे तीळ, काळे बूट आणि लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत.
-मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढते. पेन, कागद, झाडू घेणेही टाळावे.
-शनिवारी दूध आणि दही खाणे टाळावे. प्यावेच लागले तर त्यात हळद किंवा गूळ टाका. या दिवशी वांगी, कैरीचे लोणचे आणि तिखट खाणेही टाळावे.
-या दिवशी खोटे बोलल्याने नुकसानही होऊ शकते. मात्र, हे काम कोणत्याही दिवशी करू नये.
-कोणत्याही गरीब, सफाई कामगार, अंध, अपंग किंवा असहाय्य महिलेचा कोणत्याही प्रकारे अपमान करू नका.
शनिदेवाची कृपा हवी असेल, तर शनिवारी 'या' गोष्टी अवश्य करा
शनिदेवाची आराधना केल्याने परमेश्वराच्या प्रकोपापासून बचाव होतो.
शनिवारी संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शनिदेवाच्या मूर्तीसमोर काळ्या तीळ मिसळून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदेवाच्या अशुभ प्रकोपापासून बचाव होतो.
त्याचबरोबर साडेसातीचे वाईट प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे.
भगवान शंकराची पूजा करून शनिदेवही प्रसन्न होऊ शकतात.
त्यामुळे शनिवारी भगवान शिव, हनुमानजी आणि शनिदेव यांची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा.
त्याचबरोबर शनिदेवाची अपार कृपा मिळवण्यासाठी एखाद्या गरीबाला अन्नदान करा किंवा शनिवारी दान करा.
शनिवारी काळे कापड किंवा काळे तीळ दान करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी शनि मंत्राचा जप केल्याने तुम्ही जीवनातील त्रास कमी करू शकता.
हेही वाचा>>>