Shani Amavasya 2025 : ना ढैय्या ना साडेसाती...ऑगस्टची शनि अमावस्या ठरणार खास; फक्त करा 'हे' 5 उपाय, नशीब उजळलंच समजा
Shani Amavasya 2025 Upay : जर अमावस्या सोमवार किंवा शनिवारी येत असेल तर त्याचं महत्त्व आणखी वाढतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात शनि अमावस्येचा संयोग जुळून येणार आहे.

Shani Amavasya 2025 Upay : हिंदू धर्मात अमावस्या तिथी फार विशेष मानली जाते. ही तिथी पितरांना समर्पित करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र, जर अमावस्या सोमवार किंवा शनिवारी येत असेल तर त्याचं महत्त्व आणखी वाढतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात शनि अमावस्येचा (Shani Amavasya) संयोग जुळून येणार आहे.
शनि अमावस्या ऑगस्ट 2025 (Shani Amavasya 2025)
सध्या श्रावण महिना सुरु आहे. लवकरच भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यानुसार, येत्या 23 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण अमावस्या आहे. ही अमावस्या शनिवारी येत असल्या कारणाने याला शनि अमावस्या देखील म्हणतात. शनी अमावस्येला फक्त हिंदू धर्मातच नाही तर ज्योतिष शास्त्रात फार महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी शनिदेवाशी संबंधित काही उपाय करणं फार लाभदायक मानलं जातं.
शनि अमावस्या उपाय 2025 (Shani Amavasya Upay 2025)
- ज्या लोकांच्या कुंडलीत शनि दोष आहे. तसेच, ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरु आहे. अशा लोकांनी शनि अमावस्येच्या दिवशी काही उपाय करणं गरजेचं आहे. यामुळे अशुभ परिणाम होणार नाहीत. त्याचबरोबर, धनसंपत्तीतही चांगली भरभराट होईल.
- शनि अमावस्येला दिवशी शनीदेवाला मोहरीचं तेल अर्पण करा. मात्र, हे तेल अर्पण करताना मूर्तीला अर्पण न करता फक्त पाय आणि अंगठ्यावरच तेल सोडा. जर शनिदेवाची मूर्ती शिलारुपात असेल तर संपूर्ण मूर्तीवर तेल चढवा.
- संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहराच्या तेलाचा दिवा लावावा.
- शनि अमावस्येला शनिच्या संबंधित वस्तू जसे की, मोहरीचं तेल, काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडाच्या वस्तू दान करा.
- या दिवशी पूजा करताना 'ऊॅं शनैश्चराय नम:'या मंत्राचा 108 वेळा जप करा.
- शनि अमावस्येच्या दिवशी गरिबांना तसेच, गरजूंना भोजन दान करा. तसेच, तुमच्या क्षमतेनुसार, कपडे, चपला, भोजन आणि धन दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















