Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 18 To 24 August 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 18 To 24 August 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. श्रावणमास सुरु असल्या कारणाने या काळात अनेक सणसमारंभ देखील साजरे केले जाणार आहेत. तसेच, या दरम्यान अनेक शुभ ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या शुभ ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम या आठवड्यातील राशींना नेमका कसा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. मात्र, या काळात पैशांच्या बाबतीत कोणताच व्यवहार करु नका. अन्यथा तुम्हाला धन हानीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. जोडीदाराबरोबर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला करिअरच्या अनेक संधी मिळू शकतात.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तसेच, या काळात तुमच्या फिटनेसवर भर द्या. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तसेच, लवकरच तुम्ही फॅमिलीबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा नवीन आठवडा खास असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमचं मनदेखील प्रसन्न असणार आहे. कोणताही मानसिक ताण नसेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत तुम्ही पैशांच्या बाबतीत सावध असण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला धन हानीचा सामना कराव ालागू शकतो. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाचा विस्तार होण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. मात्र, कुटुंबियांचं मतही विचारात घ्या. फिरायला जाण्याचे योग लवकरच जुळून येणार आहेत.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. तुमचा संपूर्ण आठवडा सकारात्मक दृष्टीकोन राहील. तसेच, विनाकारण कोणत्याही गोष्टींवर पैसे खर्च करु नका. कुटुंबात लवकरच शुभवार्ता तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. त्यामुळे प्रयत्नशील राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















