(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amavasya 2023 : 21 जानेवारीला येणाऱ्या अमावस्येला गंगास्नानाचं महत्त्व का आहे? समुद मंथनाशी संबंधित कथा जाणून घ्या
Amavasya 2023 : पौष महिन्यात येणाऱ्या मौनी अमावस्येला लोक गंगेत स्नान करतात. असे मानले जाते की या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान केल्यासारखे शुभ फळ मिळते आणि सर्व पापे नष्ट होतात.
Shani Amavasya 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार, पौष महिन्याच्या पंधरवड्यात येणाऱ्या अमावास्येला मौनी अमावस्या (Mauni Amavasya 2023) म्हणतात. यावेळी मौनी अमावस्या 21 जानेवारी 2023 रोजी येत आहे. शास्त्रात ही अमावस्या विशेष पुण्यवान किंवा फलदायी मानली जाते. असे मानले जाते, या अमावस्येला स्नान, दान, तर्पण आणि पिंडदान केल्याने मोक्षप्राप्ती होते.
या दिवशी गंगास्नानाचेही महत्त्व
मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याबरोबरच मौनही पाळले जाते. मौनी अमावस्येला मौन व्रत ठेवून जप आणि तपश्चर्या केली जाते. यासोबतच या दिवशी गंगास्नानाचेही महत्त्व आहे. लोक अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी गंगा नदीत स्नान करतात. असे मानले जाते की, या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान केल्यासारखेच फळ मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, मौनी अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने माणसाचे सर्व दोष दूर होतात, त्याला स्वर्ग लोकात स्नान मिळते. या दिवशी उपवास, नैवेद्य आणि दान केल्याने अशक्य असलेली कामेही पूर्ण होतात.मौनी अमावस्येला गंगेत स्नान करण्याचे धार्मिक महत्त्व का आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
मौनी अमावस्या 2023 मुहूर्त
अमावस्या तिथी सुरू होते - शनिवार 21 जानेवारी सकाळी 06:17 पासून
अमावस्या तिथी समाप्त - रविवार, 22 जानेवारी, सकाळी 02:22 पर्यंत
उदयतिथीनुसार, शनिवार 21 जानेवारीला मौनी अमावस्या वैध असेल आणि या दिवशी स्नान, दान, तर्पण आणि पूजा आदी कार्ये होतील.
ज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्येला काही उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होऊन दुःखापासून मुक्ती मिळते.
गंगा स्नान आणि समुद्रमंथन यांचा संबंध
गंगास्नान हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्नान मानले जाते. गंगा आणि इतर नद्यांमध्ये स्नान करण्याचे पावित्र्य समुद्रमंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा देव आणि असुरांनी मिळून समुद्रमंथन केले, तेव्हा भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन समुद्रातून बाहेर आले. अमृत कलश मिळविण्यासाठी देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले आणि अमृतकलश हिसकावून घेण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कलशातील अमृताचे काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकसारख्या पवित्र नद्यांमध्ये पडले. पृथ्वीवर पडलेल्या अमृतामुळे या नद्या पवित्र झाल्या. त्यामुळेच सण, पौर्णिमा, अमावस्या आणि विशेष तिथींमध्ये नदी स्नान आणि विशेषत: गंगा स्नानाची परंपरा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Amavasya 2023 : शनि अमावस्येच्या रात्री करा फक्त 'हा' उपाय, धनलाभ होईल, दोषांपासून मिळेल मुक्ती