September Grah Gochar 2025 : शुक्र, बुध, गुरुसह या राशींचं होणार परिवर्तन; सप्टेंबर महिन्यात 'या' 3 राशींचं नशीब बदलणार, पैशांचा पडणार पाऊस
September Grah Gochar 2025 : सप्टेंबरमध्ये ग्रहांची स्थिती पाहिल्यास, 13 सप्टेंबरला मंगळ ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्य, बुध ग्रहापासून शुक्र ग्रहसुद्धा नक्षत्र परिवर्तन करणार आहे.

September Grah Gochar 2025 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने, सप्टेंबर महिना फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांसह नक्षत्र परिवर्तन देखील होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती पाहिल्यास, 13 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. तर, सूर्य, बुध ग्रहापासून शुक्र ग्रहसुद्धा नक्षत्र परिवर्तन करणार आहे. त्यामुळे अनेक राशींना या काळात चांगला लाभ मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 13 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह कन्या आणि तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करतील. या दरम्यान सूर्य पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी आणि हल्त नक्षत्रात असतील. त्यामुळे बुधादित्य योग निर्माण होणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना फार खास असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तु्म्ही पूर्ण करु शकता. तसेच, मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्या साहस आणि आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, नोकरी आणि व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. भगवान हनुमानाची तुमच्यार विशेष कृपा राहील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या राशीच्या लग्न भावात बृहस्पती ग्रह विराजमान आहे. त्याचबरोबर बुध ग्रह कन्या राशीत गेल्यामुळे भद्र नावाचा महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच, तुम्हाला जर नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही या काळात खरेदी करु शकता. समाजात मान-सन्मान मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना फार सकारात्क परिणाम घेऊन येणारा आहे. या काळात तुमची अनेक शुभ ग्रहांबरोबर युती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. समाजात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, अनेक सामाजिक क्षेत्रात तुम्ही सहभागी व्हाल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल.
हेही वाचा :




















