Mangal Gochar 2025 : तब्बल 18 महिन्यांनंतर मंगळ ग्रहाचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' राशीचं होणार चांगभलं; 23 सप्टेंबरपासून हातात खेळणार पैसा
Mangal Gochar 2025 : येत्या 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळ ग्रह राहूच्या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या दरम्यान मंगळ ग्रह तूळ राशीत स्थित असतील.

Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती ठराविक वेळेनुसार बदलत असते. या दरम्यान ग्रह नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा परिणाम देशभरात पाहायला मिळतो. येत्या 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळ ग्रह (Mangal Gochar) राहूच्या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. या दरम्यान मंगळ ग्रह तूळ राशीत स्थित असतील. त्यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही कोणतीही वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर चांगला ताळेळ राहील. तसेच, तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. संपत्तीशी संबंधित घरात सुरु असलेले जुने वाद मिटतील. तर, भावा-बहिणीमधील नातं अधिक घट्ट होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार शुभकारक ठरणार आहे. या काळात देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या दरम्यान तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. बिझनेसमध्ये तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहील. या काळात तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, मुलांच्या भविष्याबाबत तुम्ही योग्य निर्णय घ्याल. व्यावसायिकांना जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. तसेच, लवकरच तुम्हाला धनलाभ मिळण्याची देखील शक्यता आहे. तुमचं नेतृत्व प्रभावशाली राहील. समाजात तुम्हाला चांगला मान मिळेल.
हेही वाचा :




















