Shani Dev : पुढचे 137 दिवस शनि चालणार उलटी चाल; 'या' 3 राशी कमावणार बक्कळ पैसा, चौफेर लाभाच्या संधी
Shani Transit : काही दिवसांत शनि वक्री होणार आहे. शनिच्या उलट्या गतीने होत असलेलं संक्रमण अनेक राशींसाठी फार लाभदायी ठरणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते पाहूया
Shani Vakri 2024 : शनि लवकरच आपली चाल बदलणार आहे. जून महिन्यात शनि (Shani) कुंभ राशीत वक्री होणार आहे. शनीचं उलट गतीने होणारे मार्क्रमण काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 15 नोव्हेंबरला पुन्हा शनि सरळ चालीत मार्गक्रमण करेल. जून ते नोव्हेंबर या काळात होत असलेल्या शनीच्या वक्री चालीमुळे 3 राशींचं नशीब पालटेल, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीची उलटी चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर समजली जाते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात. कुटुंबात शांततेचं वातावरण राहील. आर्थिक परिस्थितीही स्थिर राहणार आहे. व्यवसायात होणारे नुकसान दूर होईल आणि एक चांगला व्यवसायिक भागीदार तुम्हाला मिळेल.
वृषभ रास (Taurus)
शनीची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतं. जून ते नोव्हेंबर या काळात जीवनातील समस्या कमी होऊ लागतील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल, तुमचे काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात. तुम्हाला प्रगतीसोबत प्रमोशन मिळू शकतं. नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती दिसून येईल. वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीचा मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्याकडे अशा ठिकाणाहून पैसे येतील जिथून तुम्ही विचारही केला नसेल.तुमच्या लव्ह लाईफमध्ये रोमान्स कायम राहील. करिअरची परिस्थितीही चांगली राहील. नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील आणि वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद येईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :