एक्स्प्लोर

Numerology Today 1 January 2024 : वर्षाचा पहिला दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ; आर्थिक स्थिती चांगली

Numerology Today 1 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology Today 1 January 2024 :

अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. या लोकांनी 2024 वर्षात त्यांच्या जीवनात नवीन बदलांसाठी तयार असले पाहिजे. आज तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन आनंददायी असेल. कुटुंबात शुभ कार्ये आयोजित होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तुमचे जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. आज चांगल्या सवयी अंगीकारा. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच कामाचा ताण जास्त वाढू देऊ नका.

मूलांक 2

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज मूलांक 2 असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. पैशाशी संबंधित मोठे आर्थिक निर्णय घ्याल. हुशारीने गुंतवणूक कराल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रेमसंबंध सुधारतील. आईमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे हळूहळू दूर होतील. आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 च्या लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल आणि तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रेरित व्हाल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. तुम्हाला ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. भावा-बहिणींशी संबंध सुधारतील. कुटुंबातील सदस्यांशी अनावश्यक वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुमचे मन जास्त खर्चामुळे अस्वस्थ राहू शकते. काही लोक आज गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. कामाचा ताण जास्त वाढू देऊ नका. आर्थिक निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या. नियमित ध्यान आणि योगासने करा, यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 च्या लोकांसाठी 2024 चा पहिला दिवस खूप भाग्याचा असेल. मागील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उत्पन्न झाल्याने संपत्तीत वाढ होईल. कामातील आव्हानं दूर होतील. कार्यालयात बढतीची संधी मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता. पैसे वाचवा.
आज काही लोकांना भागीदारीच्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. करिअर वाढीच्या नवीन संधीही मिळतील.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. आज मूलांक 6 चे लोक लव्ह लाईफमध्ये भावनिक होतील. तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात कटुता वाढू शकते. तुमच्या पार्टनरला असे काहीही बोलू नका, ज्यामुळे त्याच्या/तिच्या भावना दुखावतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. आज तुम्हाला तुमच्या सर्व कामात चांगले परिणाम मिळतील.

मूलांक 7

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आज तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. मात्र भागीदारी व्यवसायात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. घरामध्ये शुभ कार्य आयोजित करण्यात पैसा खर्च करावा लागेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कामातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. आज मूलांक 8 असलेल्या लोकांचे मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल. व्यावसायात चांगली बातमी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. सकारात्मक मानसिकतेने जीवनातील नवीन बदल स्वीकारा आणि आत्मविश्वासाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नवीन आर्थिक योजना बनवा आणि तुमच्या करिअरच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांनी ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळावेत. कामाच्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रामाणिकपणे हाताळा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आज तुमचे मन जास्त खर्चामुळे अस्वस्थ राहू शकते. घरात लग्नाबाबत चर्चा होऊ शकते. नवीन वर्षाची सुरुवात जीवनातील नवीन बदलांसह होईल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा. तणाव टाळा. सकस आहार घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Samsaptak Yog : आज शनि-शुक्र समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; नववर्षाची सुरुवात 'या' 5 राशींसाठी भाग्याची

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget