Samsaptak Yog : आज शनि-शुक्र समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; नववर्षाची सुरुवात 'या' 5 राशींसाठी भाग्याची
Samsaptak Yog : आज 1 जानेवारी, म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Samsaptak Yog : नवीन वर्ष 2024 (New Year 2024) आजपासून सुरू झालं असून नवीन वर्ष प्रत्येकासाठी उत्साह घेऊन येणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चंद्राने सिंह राशीत प्रवेश केला असून या दिवशी शनी शुक्र समसप्तक योग, सौभाग्य योग, आयुष्मान योग, लक्ष्मी नारायण योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे यंदा वर्षाचा पहिला दिवस खुप शुभ आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 च्या पहिल्या दिवशी शुभ योग तयार होत असल्याने पाच राशींना फायदा होणार आहे. या राशीचे लोक आज मौजमजा करताना दिसतील आणि धार्मिक कार्यातही रस घेतील. आज 1 जानेवारीचा दिवस या राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Gemini)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस, म्हणजे 1 जानेवारी हा शुभ योगामुळे चांगला राहील. वृषभ राशीचे लोक आज नवीन वर्षाचा आनंद घेतील आणि पालकांकडून देखील त्यांना आशीर्वाद मिळतील. आज तुम्ही दिवसभर मस्तीच्या मूडमध्ये असाल. तुम्ही एखाद्या आजारातून जात असाल तर तुम्हाला आज बरं वाटेल. शंकराच्या कृपेने वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचे विरोधक देखील तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतील. नवीन वर्षाच्या पहिला दिवस व्यवसायिकांसाठी चांगला असेल, व्यवसायात भांडवल गुंतवल्यानंतर नफा मिळवण्याची चांगली संधी तुमच्याकडे असेल आणि तुमच्या बँक बॅलन्सही चांगला वाढेल. आज तुम्हाला वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर व्यावसायिक जीवनातही समाधान मिळेल.
सिंह रास (Leo)
आयुष्मान योगामुळे आज, म्हणजेच 1 जानेवारी हा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. सिंह राशीचे लोक आजचा दिवस कुटुंब आणि प्रिय व्यक्तींसोबत घालवतील आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कुटुंबात चांगले पदार्थ बनवले जातील. प्रेमीयुगुलासाठी आजचा दिवस चांगला असेल, नवीन वर्षाच्या निमित्ताने ते एकमेकांना भेटतील आणि एकत्र काही धार्मिक स्थळी जाऊ शकतात. या राशीचे नोकरदार लोक आज आराम करतील. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि कुटुंबात एकता कायम राहील. शुभ योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागेल आणि तुमची आर्थिक प्रगती होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस शुभ राहील. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्या राशीच्या लोकांचं भाग्य वाढेल आणि आजूबाजूचे आनंदी वातावरण पाहून मनही प्रसन्न होईल. नवीन वर्षाच्या निमित्ताने सामाजिक लोकांशी तुमचा संवाद वाढेल आणि तुमच्या सौम्य वागण्यामुळे सर्वजण तुमची प्रशंसा करतील. नवीन वर्षाचा पहिला दिवस व्यावसायिकांसाठी चांगला राहील, अचानक संपत्तीत वाढ झाल्याने व्यापारी वर्ग आनंदी राहील आणि आर्थिक लाभही मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना भेटाल आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याल. तुम्ही मित्रांसोबत पार्टीच्या मूडमध्ये असाल आणि आज तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आज चांगले राहील आणि एकमेकांप्रती प्रेम वाढेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस लक्ष्मी नारायण योगामुळे लाभदायक राहील. आज, म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मकर राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास भरलेला दिसेल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारी काम संपल्यावर तुम्ही मित्रमंडळींना भेटाल. या राशीचे लोक जे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काम करत आहेत, ते आज आपलं काम लवकर संपवतील आणि नंतर मित्रांसोबत मजा करायला जातील. जी गोष्ट तुम्हाला खूप दिवसांपासून हवी होती, ती तुम्हाला आज मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज तुम्ही कुटुंबातील ज्येष्ठांसोबत संध्याकाळ घालवू शकता, यामुळे तुम्हाला चांगली माहितीही मिळेल.
मीन रास (Pisces)
आज, म्हणजेच 1 जानेवारी हा दिवस पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामुळे मीन राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मीन राशीचे लोक आज खूप आनंदी राहतील. व्यापाऱ्यांनी व्यवसायात घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला तर आज चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांना आज अधिकाऱ्यांची साथ मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या मंदिरात जाऊ शकतात. आज तुम्ही मित्रमंडळींसोबत मजा कराल. शंकराच्या कृपेने तुम्हाला आज अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: