Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक जोडीदार निवडण्यात करतात 'ही' घोडचूक; आयुष्यभर होतो पश्चात्ताप
Numerology Of Mulank 2 : अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 2 असतो.

Numerology Of Mulank 2 : ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात राशींवरुन व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवड-निवड कळते. त्यामुळेच, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अंकशास्त्राचं फार महत्त्व आहे. अंकशास्त्रात, 1 ते 9 मूलांकाचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठिकाणी आपण मूलांक 2 च्या संदर्भात जाणून घेऊयात.
अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 2 असतो. या ठिकाणी आपण मूलांक 2 चं वैवाहिक जीवन आणि त्यांची लव्ह लाईफ कशी असते ते जाणून घेऊयात.
कसा असतो स्वभाव?
अंकज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 2 असतो ते लोक फार भावूक आणि शांत स्वभावाचे असतात. हे लोक स्वबळावर आपलं करिअर घडवतात. तसेच, मेहनतीने पुढे जातात. या जन्मतारखेच्या लोकांमध्ये संगीत, लेखन आणि नृत्याची कला असल्यामुळे हे लोक इतरांना फार लवकर आकर्षित होतात.
मात्र, या जन्मतारखेचे लोक कधी कधी भावनेच्या भरात निर्णय घेतात आणि त्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. अंकज्योतिष शास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक जोडीदार निवडताना देखील चूक करतात.
पटकन विश्वासघात होतो
या जन्मतारखेचे लोक जरी आपापल्या क्षेत्रात करिअरमध्ये चांगली उंची गाठली असेल. तरी, हे लोक इतरांवर तसेच, आपल्या पार्टनरवर पटकन विश्वास ठेवतात. त्यामुळेच यांचा पटकन विश्वासघात होतो. याचा त्यांना नंतर फार त्रास होतो.
अंकज्योतिष शास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक आपल्या बुद्धीमत्तेसाठी ओळखले जातात. आपल्या खास बोलीने, वाणीने आणि वागमुकीने ते इतरांचं मन जिंकतात. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्याकडेही त्यांचा कल असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















