Moon And Rahu Yuti 2025 : 16 जूनपासून 'या' राशींना सावधानतेचा इशारा! धनहानीसह होणार प्रचंड मनस्ताप, ग्रहणदोषाचा परिणाम?
Moon And Rahu Yuti 2025 : सध्या 16 जून रोजी कुंभ राशीत राहू आणि चंद्राची युती होणार आहे. यामुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे.

Moon And Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराच्या कालावधीनंतर संक्रमण करतात. ग्रहांच्या या संक्रमणाचा अनेक राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. या दरम्यान अनेक योगदेखील जुळून येतात. सध्या 16 जून रोजी कुंभ राशीत राहू (Rahu) आणि चंद्राची (Moon) युती होणार आहे. यामुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे. हा योग कुंभ राशीत तब्बल 18 वर्षांनंतर आला आहे. त्यामुळे याचा काही राशींवर फार नकारात्मक परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींना अधिक संकटांचा सामना कारावा लागणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग फार नुकसानदायक आहे. या राशीच्या बाराव्या चरणात हा ग्रहण योग स्थित आहे. त्याचबरोबर, चंद्रदेखील स्थित आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. मात्र, प्रवास करताना तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागू शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग फार नुकसानकारक ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीत आठव्या चरणात हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमचं मन अस्वस्थ राहील. तसेच, तुम्हाला वाहन चालवताना देखील काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान कोणाचाही अनादर करु नका. जोडीदाराबरोबर चांगला संवाद साधा. तरच, तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग फार नकरात्मक ठरणार आहे. कारण या राशीच्या लग्न भावात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या लग्नात तर अडथळे येऊच शकतात. त्याचबरोबर, करिअरमध्ये देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराकडून सतत तक्रार होऊ शकते. तुमचा तिरस्कार केला जाऊ शकतो. त्यामुळे या काळात कोणाशीही पैशांचा व्यवहार करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















