Numerology : 'झुकेगा नहीं साला'...आपल्या म्हणण्यावर नेहमी ठाम असतात 'या' जन्मतारखेचे लोक, परिस्थितीशी करतात दोन हात
Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1 चा स्वामी ग्रह ग्रहांचा राजा सूर्य आहे. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 आहे.

Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव आपल्याला कळतो.त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. त्यानुसार, आज आपण मूलांक (Mulank) 1 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
मूलांक 1 च्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1 चा स्वामी ग्रह ग्रहांचा राजा सूर्य आहे. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 आहे. या जन्मतारखेच्या लोकांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, हे लोक आपल्या म्हणण्यावर, आपल्या तत्त्वावर टिकून असतात. तसेच, समोर येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार असतात. या ठिकाणी आपण मूलांक 1 च्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
आत्मविश्वासू वृत्ती आणि लीडरशिप क्वालिटी असते
ज्या ज्न्मतारखेच्या लोकांची खासियत अशी असते की, या लोकांमध्ये लीडर क्वालिटीज असते. तसेच, या लोकांना आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगायला आवडतं. या लोकांना तुम्ही सहज तुमच्या बोलण्यात गुंडाळू शकत नाहीत. तसेच, या लोकांनी एकदा आपलं म्हणणं मांडलं तर त्यावर ते ठाम असतात. या लोकांना मध्यात राहायला आवडत नाही. यांच्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी ते संकटांचा सामना करण्यासाठी तयार असतात. आत्मविश्वास तर या लोकांमध्ये फार असतो. अनेकदा लोकांना यांचा स्वभाव आवडत नाही.
कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडत नाही
या जन्मतारखेच्या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करणं फारसं आवडत नाही. हे लोक नोकरीत तेव्हाच खुश असतात जेव्हा त्यांना नोकरीत लीड करण्याची संधी मिळते. या जन्मतारखेच्या लोकांना बिझनेसमध्ये चांगलं यश मिळतं. यांना नेहमीच वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. कम्फर्ट झोनमध्ये राहायला यांना आवडत नाही. तसेच, यांची आर्थिक स्थितीही चांगली असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















