एक्स्प्लोर

Raj Thackeray : अमित ठाकरेंच्या लग्नाची तारीख, गाडीचा नंबर ते आता उमेदवारांची संख्या; काय आहे राज ठाकरेंचं कनेक्शन 9?

Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी 9 हा लकी नंबर तर आहे. परंतु राज यांच्याशिवाय इतर नेत्यांनीही आता सर्व निर्णयांमध्ये 9 नंबरला (Number 9) विशेष महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे, ती नेमकी कशी? जाणून घ्या.

Numerology Mulank 9 : राजकारणातली गोष्ट असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील. 9 नंबरशिवाय राज ठाकरेंचं पान हलत नाही. मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाची स्थापना असो, मनसेची पहिली सभा असो किंवा मुलाचं लग्न... मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 नंबरशिवाय कसला विचार करत नाहीत. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) गाडीचा नंबर देखील 9 आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा उमेदवार यादीचं गणित देखील 9 अंकाभोवती फिरतं.

राज ठाकरेंसाठी 9 हा नंबर लकी तर आहेच. परंतु राज यांच्याशिवाय इतर नेत्यांनीही आता सर्व निर्णयांमध्ये 9 नंबरला (Number 9) विशेष महत्त्व देण्यास सुरुवात केलं आहे, ते नेमकं कसं? जाणून घेऊया.

सर्व पक्षांची लकी नंबरमागे धाव

निवडणुकीत खेळ आकड्यांचा असतो… आकड्यांच्या बळावरच सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय करताना दिसत असतात… 9 हा आकडा युनिव्हर्सल लकी नंबर आहे… अशात, यंदाही अंकशास्त्रांचा आधार घेत भाजप, शिवसेना आणि मनसेने विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

सर्वच पक्षांच्या नेत्यांचं नंबर 9

निवडणूक आणि आकड्यांच्या आधारे सत्ता काबीज करण्यासाठी सर्व पक्षीयांनी सर्वस्व पणाला लावलंय. राजकारण्यांच्या लकी नंबर 9 ची छबी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. भाजपनं पहिली यादी जाहीर केली, ज्यात 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. सोबतच, मनसेनं देखील 45 उमेदवार आणि शिवसेनेने देखील 45 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. ज्यात सर्वांची बेरीज केल्यास 9 हा युनिव्हर्सल लकी आकडा येतो. राजकीय वर्तुळात हा आकडा शुभ समजला जातोय.

शिवसेनेपासूनच राज ठाकरेंचं नंबर 9

राज ठाकरेंनी यंदाच्या विधानसभेत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत सर्वाधिक उमेदवार उतरवण्याचा निर्धार केलाय. अशात राज ठाकरेंकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर केली गेलीय. ज्यात 4+5 = 9 हा फॉर्म्युला दिसून येतो. मनसेपासूनच नव्हे, तर शिवसेनेच्या काळापासूनच राज ठाकरेंच्या राजकीय कार्यकाळात ९ या आकड्याची छाप पाहायला मिळते.

मनसेची उमेदवार यादी 45 (4+5=9) 

राज ठाकरे आणि ९ हा त्यांच्या आवडीचा आकडा सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंच्या गाड्यांच्या नंबर प्लेटपासून ते पक्ष स्थापनेपर्यंत 9 क्रमांकाची छाप आपल्याला दिसते. यामुळे नऊ अंकाचं महत्त्व राज ठाकरेंसाठी मोठं आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसत 45 उमेदवारांची यादी त्यांनी दिलीय. त्यावर देखील 9 या आकड्याची छाप आहे. 

भाजपचंही नंबर 9

भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे.  99 जागांची यादी जाहीर करताना आकड्यांची गणितं देखील जुळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. 99 आकड्यात राजकीय वर्तुळात शुभ असलेल्या 9 आकड्याची छबी पाहायला मिळते. ही आकड्यांची जुनी जुळवाजुळव बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून भाजपात दिसते, ज्यात प्रमोद महाजन याचे मोठे वाटेकरी दिसतात.

बाळासाहेब ठाकरेही फॉलो करायचे लकी नंंबर

प्रमोद महाजन हे युतीचे शिल्पकार होते… अशात, शिवसेना भाजपच्या युतीवेळी 9 आकड्यासाठी जागावाटपात शिवसेनेला 3 अधिक जागा देऊ केल्या होत्या. सुरुवातीला 168-120 च्या फॉर्म्युल्या एकमत झालं होतं. मात्र, बाळासाहेबांशी चर्चा करत यात बदल करत हा फॉर्म्युला 171-117 असा करण्यात आला होता. जो बाळासाहेब ठाकरेंनी देखील मान्य केला होता.

एकनाथ शिंदेही रांगेत

बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीत 9 आकड्याची छबी पाहायला मिळते. त्यातच, अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून देखील त्याचा अवलंब करण्यात आला होता. अशात, एकनाथ शिंदे यांनी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत यादी जाहीर करताना 45 आकड्याची किमया करत 9 आकडा राखण्याचा प्रयत्न केलाय.

कोण मारणार बाजी?

अंकशास्त्रावर अनेकांचा विश्वास नसला तरी राजकीय वर्तुळात मात्र याला मोठं महत्त्व दिसतं. अनेक नेते कार्यकर्ते आवर्जुन त्यांचा अवलंब करताना दिसतात. भाजप, शिवसेना आणि मनसेकडून अनेकदा यादीची उदाहरणं देखील समोर आहेत. दरम्यान, असं असलं तरी कधी यश पारड्यात पडतं तर कधी अपयश वाट्यालं येतं. त्यामुळे यंदा या राजकीय आखाड्यात आकड्यांची बाजी कोण मारणार आणि यश कोणाच्या वाट्याला येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हेही वाचा:

Vidhan Sabha Elections 2024 : मनसेच्या उमेदवारांना ओवाळलं; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ओवाळणी नको, आमदारकी हवी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभेत ठाकरेंचा शिलेदार ठरला, बडा नेता हाती बांधणार शिवबंधन, भाजपसमोर तगडं आव्हान
धुळे शहर विधानसभेत ठाकरेंचा शिलेदार ठरला, बडा नेता हाती बांधणार शिवबंधन, भाजपसमोर तगडं आव्हान
Shivsena Thackeray Camp Candidates: ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर होताच बडनेराच्या प्रीती बंड यांना धक्का, हताश स्वरात म्हणाल्या....
ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर होताच बडनेराच्या प्रीती बंड यांना धक्का, हताश स्वरात म्हणाल्या....
Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cadidates File Nomination : सर्वच पक्षातले उमेदवार गुरुपुष्यामृत योग साधणार, अर्ज भरणारVijay Wadettiwar on MVA Candidates List | काँग्रेसच्या 52-54 उमेदवारांची यादी आज येऊ शकतेSanjay Patil Tasgaon vidhansabha : तासगाव कवठे महांकळमधून संजय पाटील उतरणार रिंगणातHC On Navi Mumbai Mahapalika : 10 हजार बेकायदा बांधकाम होताना काय करत होता,  उच्च सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभेत ठाकरेंचा शिलेदार ठरला, बडा नेता हाती बांधणार शिवबंधन, भाजपसमोर तगडं आव्हान
धुळे शहर विधानसभेत ठाकरेंचा शिलेदार ठरला, बडा नेता हाती बांधणार शिवबंधन, भाजपसमोर तगडं आव्हान
Shivsena Thackeray Camp Candidates: ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर होताच बडनेराच्या प्रीती बंड यांना धक्का, हताश स्वरात म्हणाल्या....
ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर होताच बडनेराच्या प्रीती बंड यांना धक्का, हताश स्वरात म्हणाल्या....
Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
Embed widget