Numerology : अतिशय सुंदर असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; सौंदर्याने सर्वांनाच पाडतात भुरळ, बोलण्यातही असतात चतुर
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या मुलींचं व्यक्तिमत्व फार आकर्षक असतं. या मुली दिसायला सुंदर तर असतातच, सोबत त्यांचा स्वभावही अतिशय गमतीशीर आणि विनोदी असतो.
![Numerology : अतिशय सुंदर असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; सौंदर्याने सर्वांनाच पाडतात भुरळ, बोलण्यातही असतात चतुर Numerology mulank 4 people are so beautiful everyone is charmed by their beauty they are also smart in speaking know their nature Numerology : अतिशय सुंदर असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; सौंदर्याने सर्वांनाच पाडतात भुरळ, बोलण्यातही असतात चतुर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/30/7fe49d32f3d88db7277ab664757191f21722318280727713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology Of Mulank 4 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 4 असलेल्या लोकांबद्दल देखील काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
मूलांक 4 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं, या मूलांकाच्या मुली दिसायला सुंदर असतात. त्यांचा स्वभावही एकदम मजेशीर असतो. 4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेच्या मुली कधी कसलं टेन्शन घेत नाहीत. त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे. या मुली नेहमी स्वत:च्या तंद्रीत असतात, त्या कुणाच्याही अध्यात-मध्यात जास्त पडत नाहीत. प्रेमविवाहावर त्यांचा विश्वास असतो. या व्यक्तींबद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
दिसायला सुंदर असतात या जन्मतारखेच्या मुली
4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेच्या मुली दिसायला सुंदर असतात, यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असतं. आपल्या सौंदर्याने त्या कोणालाही सहज भुरळ पाडू शकतात. त्यांचा प्रेमविवाहावर विश्वास असतो. या मुली लव्ह लाईफच्या बाबतीत खूप निवडक असतात, त्या इतरांवर अगदी सहजपणे प्रभाव टाकू शकतात. मनात असलेली व्यक्ती त्यांना मिळतेच.
बोलण्यातही असतात चतुर
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 चे लोक बोलण्यातही फार चतुर असतात. गोड गोड बोलून त्या समोरच्याला सहजपणे प्रभावित करू शकतात. कुठे कसं काय बोलायचं हे त्यांना बरोबर कळतं. या मुली त्यांच्या कुटुंबावर प्रेम करतात. तसेच त्यांना फ्रेंड सर्कलमध्येही विशेष स्थान मिळतं.
आर्थिक स्थिती असते मजबूत
या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. मूलांक 4 चे लोक पैसे पाळून असतात, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा टिकतो. अनावश्यक गोष्टींवर खर्च करायला त्यांना आवडत नाही. या लोकांना उगाच दिखावा आवडत नाही. या जन्मतारखेच्या लोकांना भौतिक गोष्टींची इच्छा कमी असते. हे लोक काटकसरी असले तरी त्यांचं घर सुंदर सजवलेलं असतं.
चारचौघात उठ-बस यांना आवडते
4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेचे लोक आयुष्यात पुढे जाऊन इतकं मोठं काम करतात की सगळेच त्यांना पाहून थक्क होतात. त्यांना लोकांमध्ये बसल्यावर आनंद वाटतो, चारचौघात बसणं यांना आवडतं. या लोकांना प्रवासाची आवड असते. तसेच, या लोकांना सुखी जीवन जगणं आवडतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)