एक्स्प्लोर

Numerology : अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, जिथे जातील तिथे होतं यांचं कौतुक

Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांचं डोकं फार चालतं. हे लोक मनाने फार चांगले असतात, परंतु यांच्यात आत्मविश्वासाची थोडी कमी जाणवते.

Numerology Mulank 2 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांची काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे, या मूलांकाचे लोक अत्यंत शांत, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. या लोकांच्या मनात खोट नसते. यासोबतच या मूलांकाचे लोक सुंदर व्यक्तींकडे पटकन आकर्षित होतात. या मूलांकाबद्दलच्या आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

प्रचंड बुद्धिजीवी असतात या जन्मतारखेचे लोक

2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे फार हुशार असतात. बौद्धिक कार्यांत यांचं डोकं फार चालतं, त्यांच्या या गुणामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतं. जिथे जातील तिथे त्यांची पाठ थोपटली जाते. या व्यक्तींना समाजात चांगला मान मिळतो. बुद्धीच्या जोरावर या व्यक्ती हवं ते प्राप्त करू शकतात.

पै पै करुन पैसा जमा करतात

मूलांक 2 चे लोक पैसे साठवण्यात एक्सपर्ट असतात. या लोकांना पैशांची किंमत कळते, म्हणून ते जास्त उधळपट्टी करत नाहीत. पैशाची चांगली गुंतवणूक करण्याला ते प्राधान्य देतात. नोकरी-व्यवसायात या लोकांना चांगलं यश मिळतं.

आत्मविश्वासाची असते कमी

मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही. तसेच त्यांचा स्वभावही सतत बदलणारा असतो. अनेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभावही दिसून येतो.

या क्षेत्रांत करतात चांगली कामगिरी

मूलांक क्रमांक 2 असलेले लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते.

स्वभावाने असतात शांत आणि सहनशील

या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने परिस्थितीचा सामना करतात. या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वय साधण्यात पटाईत असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology : पटकन हायपर होतात 'या' जन्मतारखेचे लोक ; नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चाAmbani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून बाप्पाचं दर्शनEknath khadse Special Report : महायुतीचं सरकार जावो, मविआ येवो : एकनाथ खडसेManoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Basmati Export: बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Embed widget