Numerology : 'मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा'...'या' जन्मतारखेचे लोक एकमेकांचे असतात कट्टर शत्रू; लग्नानंतरही असतो 36 चा आकडा
Numerology : काही जन्मतारखेच्या लोकांचं आपसांत अजिबात पटत नाही. या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की हे मूलांक नेमके कोणते आणि त्यांचं आपापसांत का पटत नाही.

Numerology : अंकज्योतिष शास्त्रानुसार (Ank Shastra), प्रत्येक व्यक्तीचा आपापला मूलांक (Mulank) असतो. हा मूलांक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार ठरवला जातो. यामध्ये काही मूलांकाचे लोक एकमेकांत सहज मिसळून जातात. तर, काही जन्मतारखेच्या लोकांचं आपसांत अजिबात पटत नाही. या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की हे मूलांक नेमके कोणते आणि त्यांचं आपापसांत का पटत नाही.
लग्नानंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचा असतो 36 चा आकडा
प्रत्येक व्यक्तीचा आपला एक वेगळा स्वभाव असतो. याच स्वभावाच्या आधारे व्यक्तींचे एकमेकांशी मतं जुळतात. यासाठीच लग्न जुळवताना आधी एकमेकांच्या पत्रिका पाहिल्या जातात. एकमेकांच्या स्वभावातील गुण-दोष पाहिले जातात. अंकशास्त्रानुसार, काही मूलांक (जन्मतारखेचे लोक) असे आहेत ज्यांचं आपापसांत कधीच पटत नाही.
जन्मतारीख आणि मूलांक
अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. तर, ज्या लोकांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला जाला आहे त्यांचा मूलांक 8 असतो. या जन्मतारखेच्या लोकांचं आपापसांत कधीच पटत नाही.
एकमेकांचे असतात शत्रू
ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1 आणि 8 हे एकमेकांचे कट्टर शत्रू असतात. या दोन्ही जन्मतारखेचे लोक एकमेकांचा तिरस्कार करतात. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांची कधीच एकमेकांशी मैत्री होत नाही. आणि जर मैत्री झालीच तर त्यात सतत वाद-विवाद असतात. यासाठीच मूलांक 1 आणि 8 च्या लोकांना एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो.
ग्रहांचा राजा
अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याला आपण ग्रहांचा राजा म्हणतो. तर, दुसऱ्या मूलांकाचा स्वामी शनि आहे. मान्यतेनुसार, सूर्य आणि शनि यांच्यात पिता-पुत्राचं नातं आहे. त्यामुळे यांचं एकमेकांशी पटत नाही.
एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला
अंकज्योतिष शास्त्रानुसार, असं मानण्यात आलं आहे की, मूलांक 1 आणि 8 चे लोक जर एकमेकांच्या बरोबर राहिले तर त्यांच्यात वाद निर्माण होऊ शकतो. याचं कारण म्हणजे, त्यांचा स्वभाव आणि दृष्टीकोन फार वेगवेगळे असतात. त्यामुळे या लोकांना एकमेकांशी विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















