Numerology: प्रेम एकासोबत, लग्न दुसऱ्याशी? 'या' जन्मतारखेचे लोक कुटुंबाच्या मर्जीने लग्न करतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: अंकशास्त्रानुसार, काही लोक असे असतात, जे एका व्यक्तीवर प्रेम करतात, परंतु कुटुंबाच्या संमतीनेच लग्न करतात. जाणून घेऊया कोणत्या जन्मतारखेचे लोक आहेत...

Numerology: ते म्हणतात ना, खरं प्रेम मिळायला भाग्य लागतं.. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की काही लोक एखाद्यावर इतकं प्रेम करतात, की त्याला आपलं सर्वस्व देतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते जोडीदाराला शेवटपर्यंत साथ देतात. परंतु काही लोक असे असतात, जे प्रेम एकासोबत, तर कुटुंबाला विरोध करायला जमत नाही, म्हणून ते कुटुंबाच्या संमतीनेच लग्न करतात. अंकशास्त्रानुसार, अशा लोकांमध्ये एक सामान्य गोष्ट म्हणजे त्यांची जन्मतारीख, अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत, जे प्रेमात आपले हृदय वापरतात, परंतु जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा ते मनाने निर्णय घेतात. अंकशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत? असे काही लोक कुटुंबासाठी प्रेमात दिलेली वचने आणि प्रतिज्ञा मोडतात.
'या' जन्मतारखेचे लोक कुटुंबाला विरोध करू शकत नाहीत
अंकशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल. तर त्या लोकांचा मूलांक 5 असतो, आणि या क्रमांकाचा स्वामी बुध आहे. ही संख्या बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद कौशल्य आणि धैर्याचे प्रतीक आहे. परंतु काही लोक प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान नसतात, कारण त्यांना प्रेमाच्या जोडीदारासोबत लग्न जरी करायचे असले तरी तो त्याच्या कुटुंबाला विरोध करू शकत नाही.
ते मनाने चांगले असतात पण...
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 23 किंवा 14 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 असलेले लोक मनाने चांगले असतात, परंतु त्यांनी त्यांच्या हृदयावर वर्चस्व गाजवू देत नाही अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागते. हे लोक विचारपूर्वक आणि त्यांच्या वडिलांचा सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेतात, त्यानंतरच त्यांच्या यशाची शक्यता वाढते.
बंधनात राहणे आवडत नाही
अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 असलेल्या लोकांना बंधनात राहणे आवडत नाहीत. जर त्यांना कोणतेही काम किंवा नाते जबरदस्तीने करावे लागले तर ते कधीही करत नाहीत. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगायला आवडते. जर या लोकांना योग्य वेळी कोणाचा पाठिंबा किंवा मार्गदर्शन मिळाले, तर त्यांच्या यशाची शक्यता जास्त असते.
या लोकांचे व्यक्तिमत्त्व इतरांना आकर्षित करते...
अंकशास्त्रानुसार, अंक 5 असलेले लोक स्वभावाने उत्सुक असतात आणि त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास आणि करायला आवडते. या लोकांना त्यांच्या आयुष्यात बदल आणि विविधता आवडते आणि त्यांना तीच गोष्ट कंटाळवाणी वाटते. ते त्यांच्या मजबूत व्यक्तिमत्त्वाने इतरांना आकर्षित करतात.
त्यांच्या शब्दांनी इतरांवर प्रभाव टाकतात...
अंकशास्त्रानुसार, 5 या अंकाचे लोक मनमिळावू आणि आकर्षक असतात, हे लोक त्यांच्या शब्दांनी इतरांवर प्रभाव टाकू शकतात. म्हणूनच लोक त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात आणि लोक त्यांना खूप आवडतात. त्यांना प्रेमाचा आनंद देखील मिळतो पण फक्त प्रेमापर्यंत, लग्नासाठी ते कुटुंबाच्या निवडीवर विश्वास ठेवतात.
हेही वाचा :
Navpancham Yog 2025: 7 जुलै लक्षात ठेवा! 3 राशींच्या हातात मावणार नाही इतका पैसा येणार, नवपंचम योगामुळे कुबेराची मोठी कृपा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















