November Monthly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नोव्हेंबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Monthly Horoscope November 2024 : नोव्हेंबर महिना अनेक राशींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. नोव्हेंबरचे 30 दिवस काही राशींसाठी सुखाचे असतील तर काहींसाठी अडचणीचे. मेष ते कन्या राशीचा नोव्हेंबर महिना कसा राहील? जाणून घ्या
November 2024 Monthly Horoscope : नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. नोव्हेंबरमध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, नोव्हेंबरमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध या प्रमुख ग्रहांच्या राशीत बदल होणार असून, त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. अशात मेष ते कन्या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना कसा राहील? जाणून घ्या
मेष (Aries Monthly Horoscope November 2024)
मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. जर तुम्ही ते पार करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. इतरांच्या मदतीने तुमची अपूर्ण कामंही पूर्ण होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादं नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होईल, परंतु यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाया जाईल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. प्रियकरासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात राहाल. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी सासरच्या लोकांच्या भावनांचा आदर करा.
वृषभ (Taurus Monthly Horoscope November 2024)
नोव्हेंबरच्या सुरुवातीला अचानक मोठे खर्च निघतील, आर्थिक बजेट बिघडू शकतं. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. परदेशात व्यवसाय करणाऱ्या किंवा तेथे करिअर शोधणाऱ्या लोकांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा भाग्यवान ठरू शकतो. या काळात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. महिन्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कौटुंबिक स्थिती चांगली राहील.
मिथुन (Gemini Monthly Horoscope November 2024)
मिथुन राशीच्या लोकांनी नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही कामात निष्काळजी राहणं टाळावं, अन्यथा तुमचं पूर्ण होत आलेलं काम बिघडू शकतं. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे पैसे हुशारीने खर्च करावे लागतील, अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकतं. या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमची कोणतीही योजना पूर्ण होण्याआधीच लोकांसमोर उघड करू नये, अन्यथा तुमचे विरोधक त्यात अडथळा आणू शकतात. या काळात वाहन काळजीपूर्वक चालवा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. लव्ह लाईफ सामान्य राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कर्क (Cancer Monthly Horoscope November 2024)
नोव्हेंबर महिना कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत खुले होतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल, परंतु उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. या काळात घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च होतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करिअर व्यवसायात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल, तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल.
सिंह (Leo Monthly Horoscope November 2024)
सिंह राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना मागील महिन्यापेक्षा अधिक शुभ राहील. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास लाभाचे ठरतील. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या महिन्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जमीन-इमारती संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने असेल. कमिशनवर काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभ्यासावरुन लक्ष विचलित होऊ शकतं. महिन्याच्या शेवटी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कन्या (Virgo Monthly Horoscope November 2024)
कन्या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांवर महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जास्त असेल. दुसऱ्या आठवड्यात काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसह किंवा जवळच्या मित्रांसह फिरायला जाता येईल. महिन्याच्या मध्यात कन्या राशीच्या लोकांना अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. मात्र, हितचिंतक मदतीला धावतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. प्रियकरासोबत परस्पर विश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा :