(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nostradamus Predictions : 2023 मध्ये जगावर कोरोनापेक्षाही भयंकर संकट, नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी खरी ठरणार?
Nostradamus Prediction 2023 : फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रेडॅमस याची 2023 वर्षासाठी केलेली भविष्यवाणीने जगाला चिंतेत टाकलं आहे.
Nostradamus Predictions 2023 : फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रेडॅमस (Nostradamus) आणि त्याच्या भविष्यवाणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. नॉस्ट्रेडॅमस या फ्रेंच भविष्यकाराने 1566 मध्ये त्याच्या मृत्यूपूर्वी एकूण 6338 भविष्यवाण्या लिहिल्या होत्या, या भविष्यवाण्यांमध्ये जगाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. आपल्या जगाचा अंत कधी आणि कसा होईल, हेही नॉस्ट्रेडॅमसने सांगितले होते. अनेकांचा नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाण्यांवर विश्वास आहे. महायुद्धापासून ते अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या सर्व घटना नॉस्ट्रेडॅमसने आपल्या भविष्यवाण्यांमध्ये आधीच लिहून ठेवल्या होत्या. त्यातील अनेक घटना खऱ्या झाल्या असे मानले जाते. नॉस्ट्रेडॅमसने 2023 या वर्षासाठीही काही भविष्यवाण्या केल्या आहेत. 2023 वर जगावर कोणत्या नव्या संकटाबद्दल नॉस्ट्रेडॅमसने भविष्यवाणी केली आहे ते वाचा.
अवकाशातून आगीचा वर्षाव
नॉस्ट्रेडॅमसने आपल्या भविष्यवाणीत लिहिले आहे की, 2023 मध्ये अवकाशातून आगीचा वर्षाव होईल. काही लोकांच्या मते, पृथ्वीवर अवकाशातून मोठं संकट कोसळणार आहे. काही लोकांच्या मते, याचा अर्थ जगाच्या अंत असल्याचे म्हटले जात आहे. तर, काहीच्या मते, हा नवीन सभ्यतेच्या उदय असल्याचं सांगितलं जात आहे. 2023 वर्षात नवीन सभ्यतेचा उदय होईल असे, म्हटले जात आहे. तर काहींच्या मते, याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी असल्याचे म्हटले जात असून या वर्षात पृथ्वीवर तापमान वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तिसरे महायुद्ध
नॉस्ट्रेडॅमसने 2023 बद्दल भविष्यवाणीत लिहिले आहे की, 'महान युद्धाचे 7 महिने, लोक वाईट कृत्यांमुळे मरण पावले.' काही लोक या भविष्यवाणीला तिसरे महायुद्ध म्हणून पाहत आहेत. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये दहा महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दुसरीकडे आता चीन आणि तैवानमध्येही संघर्ष सुरू आहे. म्हणून नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी खरी ठरणार का हे येणाऱ्या काळात पाहवे लागेल.
माणूस मंगळावर पोहोचेल
नॉस्ट्रेडॅमसनेही मंगळाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी 2023 बद्दल लिहिले आहे, 'मंगळावर प्रकाश पडत आहे'. काही लोकांचा असा विश्वास आहे की, ही भविष्यवाणी मानवाने मंगळावर पाऊल ठेवण्याशी संबंधित आहे. या वर्षात मानवाला मंगळावर पोहोचण्याच्या मोहिमेत मोठे यश मिळेल असे, म्हटले जात आहे. स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनी आधीच सांगितले आहे की, ते मंगळावर मानवी वसाहत स्थापन करणार आहेत. इतर देशांतील शास्त्रज्ञांकडूनही शोध मोहिम सुरु आहे.
नवीन पोप
ख्रिश्चन समाजात पोपची भूमिका मोठी आहे. नॉस्ट्रेडॅमसनेही आपल्या भविष्यवाणीत याबद्दही लिहिले आहे. पोपविषयी नॉस्ट्रेडॅमसने भविष्यवाणी करत लिहिले आहे की, पोप फ्रान्सिसच्या जागी दुसरा कोणी आला तर तो खरा पोप होणार नाही. उलट यामुळे मोठा घोटाळा समोर देईल. नॉस्ट्रेडॅमसच्या मते पोप फ्रान्सिस हे शेवटचा खरे पोप होते.
दोन महान शक्ती एकत्र येतील
नॉस्ट्रेडॅमसने 2023 वर्षाच्या संदर्भात केलेल्या भविष्यवाणीमध्ये त्यांनी लिहिले आहे की, यावेळी जगातील दोन महान शक्ती एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, सध्या चीन आणि रशिया या देशातील संबंध अधिक चांगले होऊ हे दोन्ही देश एकमेकांच्या जवळ येत आहेत. यावरून नॉस्ट्रेडॅमसच्या भाकितांमध्ये तथ्य असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर भारत एक नवी शक्ती म्हणून जगासमोर आपले स्थान निर्माण करत आहे. काही लोक नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी खरी मानतात तर काही लोक याला निव्वळ योगायोग मानतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.