एक्स्प्लोर

Baba Vanga : ...तर 2023 मध्ये होईल विणाशकारी तिसरे महायुद्ध, नव्या वर्षासाठी बाबा वेंगांची झोप उडवणारी भविष्यवाणी

Baba Vanga : भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2022 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांनी 2023 साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत.

Baba Vanga : भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2022 साठी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांनी 2023 साठी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 या वर्षात अनेक मोठ्या घटना घडणार आहेत. हे वर्ष शोकांतिकांनी भरलेले असेल. यासोबतच पृथ्वीच्या कक्षेत अणुहल्ल्यामुळे अनेक बदल देखील होणार आहेत. यासोबतच बाबा वेंगा यांनी यावर्षी भयंकर युद्ध आणि सौर त्सुनामीची देखील भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा ही बल्गेरियाची एक महिला भविष्यकार आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. बाबा वेंगा यांनी यापूर्वी 9/11 चा अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला यासह अनेक भाकिते केली होती. त्यांची ही भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी 2023 साठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या धोकादायक आहेत. 

Baba Vanga predictions : तीसरे महायुद्ध आणि परमाणु विस्फोट

बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर 2023 मध्ये अणुऊर्जेचा स्फोट होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होईल शिवाय पैशाचे देखील नुकसान होणार आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या संदर्भात बाबा वेंगाचे भाकीत विश्लेषक पाहत आहेत. विश्लेषकांच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तिसऱ्या महायुद्धाचे रूप घेऊ शकते. याशिवाय बाबा वेंगा यांनी असेही म्हटले आहे की, एखादा मोठा देश जैविक शस्त्रांनी हल्ला करू शकतो. यात हजारो लोक मारले जातील.

Baba Vanga predictions :  सौर वादळ येणार? 

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, सौर वादळ म्हणजे सूर्यापासून निघणाऱ्या ऊर्जेचा स्फोट होऊ शकतो. या स्फोटामुळे अनेक धोकादायक किरणोत्सर्ग पृथ्वीवर पडतील. पृथ्वीसाठी हे अत्यंत घातक ठरू शकते. त्याचा प्रभाव अब्जावधी अणुबॉम्ब सारखा शक्तिशाली असू शकतो. हे सौर वादळ भयंकर विनाश घडवू शकते. 

Baba Vanga predictions :  प्रयोगशाळेत तयार होणार बाळ  

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये बाळांना प्रयोगशाळेत विकसित केले जाईल आणि त्यांच्या त्वचेचा रंग व लिंग त्यांचे पालक ठरवतील. अशा परिस्थितीत बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर आता मानवाकडून मुलांना जन्म देण्याची परंपरा संपुष्टात येऊ शकते.

Baba Vanga predictions :  एलियनचा हल्ला होईल

बाबा वेंगांच्या भविष्यवाणीत असे म्हटले आहे की, 2023 मध्ये पृथ्वीवर दुसऱ्या ग्रहावरून येणाऱ्या शक्तींचा हल्ला होऊ शकतो. ज्यात लाखो लोक मारले जातील. विश्लेषक एलियन हल्ल्याचा अंदाज घेत आहेत. या हल्ल्यामुळे लोकांचे आणि पैशाचे खूप नुकसान होऊ शकते. 

Baba Vanga predictions :  वीज प्लांटमध्ये स्फोट झाल्याने लोकांना गंभीर आजार होणार  

बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, वीज प्लांटमधील स्फोटामुळे जगभरात विषारी ढग पसरू शकतात आणि संपूर्ण आशिया खंड अंधारात बुडू शकतो. यामुळे गंभीर आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

Baba Vanga predictions :  जैविक शस्त्रांनी हल्ला 

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जैविक शस्त्रांनी देशावर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे बळी जातील. सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जैविक शस्त्रांच्या वापराबाबत अनेकदा बोलले आहे. 

Baba Vanga predictions :  अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट 

बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2023 मध्ये आशिया खंडातील अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार त्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.  

महत्वाच्या बातम्या

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल 

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget