Navpancham Rajyog 2025 : मंगळ-गुरु ग्रहामुळे जुळून आला नवपंचम राजयोग; 13 सप्टेंबरपासून नशिबाला लागणार चार चॉंद, हातात खेळणार पैसाच पैसा
Navpancham Rajyog 2025 : 13 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच आज मंगळ ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीत मंगळ ग्रह आल्याने अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे.

Navpancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह नवग्रहांपैकी सर्वात खास ग्रह मानला जातो. मंगळ ग्रह जवळपास 45 दिवसांपर्यंत एकाच राशीत स्थित असतो. 13 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज मंगळ (Mars) ग्रह कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीत मंगळ ग्रह आल्याने अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. तर, मिथुन राशीत स्थित असलेल्या गुरु ग्रह बृहस्पतीसह संयोगाने नवपंचम राजयोग (Navpancham Rajyog) निर्माण होणार आहे. आता गुरु-मंगळ ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग कोणत्या राशींसाठी शुभकारक ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार. भूमिपुत्र मंगळ ग्रह 13 सप्टेंबर 2025 रोजी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह मिथुन राशीच्या पाचव्या आणि गुरु ग्रह तूळ राशीच्या नवव्या चरणात विराजमान आहे. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी निर्माण होणारा नवपंचम राजयोग फार लकी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, बृहस्पती ग्रहाची दृष्टी पडल्याने तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ निर्माण होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच, भविष्यात तुम्ही पैशांची बचत कराल. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
मंगळ-गुरु ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग कुंभ राशीसाठी फार अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक क्षेत्रात चांगला लाङ मिळेल. तसेच, शिक्षण आणि करिअरमध्ये तुमची प्रगती दिसून येईल. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी नवपंचम राजयोग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची दिर्घकाळापासून सुरु असलेल्या परिस्थितीतून सुटका होईल. तसेच, जुन्या वादविवादातून तुमची सुटका होईल. मानसिक शांती मिळेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घेऊ शकाल. तसेच, तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















