Navdurga 2024 : कोरोनाच्या लढाईत मोलाचा वाटा, गरजू पिडीतांची सेवा; डॉ. गौरी कापरे वैदय यांच्या धैर्याची गाथा; वाचा विशेष मुलाखत
Navdurga 2024 : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मूळ रहीवाशी असलेल्या डॉ. गौरी कापरे वैदय यांनी नागपूरच्याच गव्हर्नमेन्ट मेडीकल कॉलेज मधून 2009 साली ई.एन.टी. स्पेशालिस्ट म्हणून पदवी मिळवली.
Navdurga 2024 : काळ कुठलाही असो... समाजात आरोग्य आणि आरोग्य विषयक सेवांचे महत्त्व कायमच असते. निरोगी जीवनाचं प्रतीक असलेला आजचा हा हिरवा रंग... आणि म्हणूनच हया आजच्या रंगाची मानकरी आहे... आधुनिक अष्टभुजेचं रूप असलेली आजची दुर्गा सुप्रसिध्द ईएनटी स्पेशालीस्ट... अर्थात नाक-कान-घसा तज्ञ डॉ. गौरी कापरे वैदय! कोरोनाचा महाभयंकर विषाणू... नाकावाटे प्रवेश करून, घश्याच्या माध्यमातून सर्व शरीराचा ताबा घेत... पेशंटसाठी जिवघेणा ठरत असे. त्यामुळे त्या महामारीच्या काळयाकुट्ट कालावधीत सर्वच नाक-कान-घसा तज्ञांची एक मोठी अग्निपरीक्षाच होती. पण डॉ. गौरी यांच्या रूपातील या आधुनिक अष्टभुजेने, आपल्या आठच नव्हे तर वेळ पडताच, अक्षरषः सोळा हातांनी गरजू पिडीतांची सुश्रुषा केली. आपल्या नागपूर या कार्यक्षेत्रातील अनेक रूग्णांना आपली सेवा तर दिलीच पण त्याचबरोबर काही मार्गदर्शनपर व्हिडीयोंच्या माध्यमांतून... बाकी इतरही ठिकाणच्या अनेकांना कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करून हया महारोगाविरोधातल्या लढाईत आपला मोलाचा वाटा उचलला !
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मूळ रहीवाशी असलेल्या डॉ. गौरी कापरे वैदय, हयांनी नागपूरच्याच गव्हर्नमेन्ट मेडीकल कॉलेज मधून 2003 साली एम. बी.बी.एस ची स्नातक पदवी आणि 2009 साली त्याच कॉलेजमधून ई.एन.टी. स्पेशालिस्ट म्हणून एम. एस. ही स्नातकोत्तर पदवी मिळवली आणि आजपर्यंत... एक अतिशय प्रथितयश Otolaryngologists 1 म्हणून काम करण्याचा तब्बल 23 वर्षांचा अनुभव त्यांना आहे. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अशा डॉ. गौरी यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करताच, आमचे अर्धे दुखणे त्वरीत बरे होते आणि... उरलेले त्यांच्या उचित अशा मार्गदर्शनाने... असे त्यांचे अनेक समाधानी पेशंटस अगदी आवर्जून सांगतात.
वैदयकीय क्षेत्रातील आपल्या या प्रदीर्घ अशा कार्यकाळात... डॉ. गौरी यांनी रूग्ण सेवेच्या बरोबरच अनेकही महत्त्वाच्या कामगिरी बजावलेल्या आहेत. सध्या नागपूर येथील नीती क्लीनीक्स या संस्थेच्या माध्यमातून आपली सेवा देणा-या डॉ. गौरी President, Vidarbha Association of Otolaryngologists & President, Federation of branches of AOI Maharashtra State अशा अनेक अग्रगण्य संस्थांच्या एक माननीय सदस्या म्हणूनदेखील कार्यरत आहेत. मुंबईच्या के. ई. एम. हॉस्पीटलमध्ये असतांना डॉ. गौरी हयांनी व्हॉईस डिसॉर्डर या विषयाचे शिक्षण घेतले ... पुढे त्यांनी याच विषयावर सखोल संशोधन करून, अनेक व्हॉईस डिसॉर्डरच्या पिडीतांवर उपचार करून, त्यांना त्या व्याधीवर मात करण्यासाठी मदत केली आणि अजूनही करत आहेत...... Endoscopy and skullbase surgery आणि Cochlear Implants या विषयांवरची फेलोशीपही त्यांनी मिळवलेली असून... आजवरच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक मोठमोठ्या वैदयकीय परीसंवादांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवरील पेपर्स आणि पोस्टर्स सादर केलेले आहेत आणि त्यांनी त्यात अनेक मानाचे पुरस्कारही मिळवलेले आहेत! अशा या अष्टभुजेला आमचे शतशः नमन!
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा:
Navdurga 2024 : आधुनिकतेच्या जगातील नवदुर्गा! कॉम्प्युटरच्या क्षेत्रात डॉक्टरेट; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणाऱ्या डॉ. मीरा नार्वेकर यांची कहाणी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )