Moon Transit 2025: आजचा मंगळवार ठरणार 'जायंट किलर!' चंद्राच्या संक्रमणामुळे मिथुन, मकरसह 'या' राशींची चांदीच चांदी! आता टेन्शन नसेल..
Moon Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 7 जानेवारीचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करेल, या राशी बदलामुळे कोणत्या 3 राशींना फायदा होईल? जाणून घ्या
Moon Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 7 जानेवारीचा मंगळवार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज होणारे ग्रहांचे राशी बदल हे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत. तसं पाहायला गेलं तर, वैदिक ज्योतिषशास्त्रात, चंद्र हा त्वरीत राशी आणि नक्षत्र बदलणारा ग्रह आहे. चंद्र हा मन आणि स्त्रियांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो, ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा कोणत्याही राशीमध्ये फक्त अडीच दिवस, तसेच कोणत्याही नक्षत्रात फक्त एक दिवस राहतो. रविवारी, 5 जानेवारी रोजी 12 राशीच्या शेवटच्या राशीत प्रवेश केल्यानंतर, आज मंगळवारी 7 जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या संक्रमणाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया, चंद्राच्या राशीबदलाचा कोणत्या राशीला फायदा होणार आहे?
7 जानेवारी रोजी चंद्राचे संक्रमण, कोणत्या राशींना होणार फायदा?
वैदिक पंचांगानुसार चंद्र 7 जानेवारीला मंगळाच्या राशीत प्रवेश करेल. मंगळवार, 7 जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे 3 राशींचे भाग्य उजळू शकते. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?
चंद्राच्या संक्रमणामुळे 3 राशींच्या लोकांमध्ये आनंदी-आनंद!
मिथुन - संपत्तीत वाढ होण्याची शक्यता
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीसाठी चंद्राचे भ्रमण फलदायी ठरेल. सामाजिक कार्यात तुमची विशेष आवड वाढेल. जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर ती दूर होईल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. मनात एक वेगळाच उत्साह राहील. कोणताही निर्णय सावधगिरीने घ्या. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कामात यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक राहील.
मकर - नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीसाठी चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. आरोग्य चांगले राहील. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नातेवाईकांच्या भेटीला जावे लागेल. मनात उत्साह राहील. फक्त तणाव असू शकतो ज्यामुळे लवकरच आराम मिळेल. नातेसंबंध सुधारू शकतात.
मीन - चांगले भाग्य देईल
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीतील चंद्राचे संक्रमण मीन राशीच्या लोकांना चांगले भाग्य देईल. सामाजिक कार्यात तुमची विशेष आवड वाढेल. समाजात नवी ओळख निर्माण करू शकाल. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. मोठ्या करारावर स्वाक्षरी करू शकता. रखडलेली कामे पूर्ण होतील. मनामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. अविवाहित लोक एकत्र येऊ शकतात. विवाहित लोकांशी संबंध चांगले राहू शकतात.
हेही वाचा>>>
Shani Dev: 2025 मध्ये शनिदेवांचा न्याय होणार! 'या' 2 राशींना सावध राहण्याची गरज? साडेसाती टाळण्यासाठी 'हा' मंत्र प्रभावी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )