Rajyog : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू-मंगळ ग्रहाची युती; 'या' राशींच्या नशिबी पैशांची भरभराट, उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले
Guru Mangal yuti : ज्योतिष शास्त्रानुसार, गुरू-मंगळ युतीमुळे राजयोग बनत आहे, ज्याचा फायदा वृषभसह 3 राशींना होईल, त्यांच्या धनात अपार वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Mars Jupiter Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर राशी बदलतात आणि जेव्हा या ग्रहांचा संयोग जेव्हा दुसऱ्या ग्रहांशी होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) होतो. त्यातच आता मंगळ (Mar) ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे, जिथे गुरू (Jupiter) आधीच स्थित आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे गुरु-मंगळ राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचं भाग्य बदलू शकतं. या लोकांच्या संपत्तीतही अमाप वाढ होऊ शकते. या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
गुरु-मंगळ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या चढत्या घरात हा योग तयार होत आहे . त्यामुळे यावेळी तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. नोकरीत बदली किंवा बढतीचीही शक्यता आहे. व्यवसायातील कोणतीही महत्त्वाची योजना पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी वेळ अतिशय शुभ आहे. यावेळी, विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तसेच, अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
सिंह रास (Leo)
गुरु-मंगळ राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो, कारण हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या दहाव्या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकतं. तसेच सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला यावेळी नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे चांगला नफा मिळू शकतो. त्याचसोबत, वाहन खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकतं.
तूळ रास (Libra)
गुरु-मंगळ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या आठव्या घरात होत आहे. त्यामुळे नोकरदार लोकांसाठी यावेळी उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहील. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच यावेळी तुमची प्रसिद्धी वाढेल, तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. कौटुंबिक जीवनातही शांततेचं वातावरण राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :