Surya Gochar 2024 : 16 जुलैपासून 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं उजळणार; धन-संपत्तीने घर-दार होणार समृद्ध, रिकामी तिजोरीही होणार फुल्ल
Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य महिन्यातून एकदा संक्रमण करतो. या महिन्यात 16 जुलै 2024 रोजी सूर्य आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे 5 राशीचे लोक समृद्ध जीवन जगतील.
Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य हा आत्मा, कीर्ती, यश, आत्मविश्वास, आरोग्य यांचा कारक आहे. कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असल्यामुळे व्यक्तीला यश परिणाम मिळतात. व्यक्तीला उच्च स्थान आणि प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळते. या महिन्यात सूर्याचं संक्रमण होऊन सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
16 जुलै रोजी कर्क राशीत होणारं सूर्याचं भ्रमण 5 राशींसाठी खूप लाभदायक ठरेल. सूर्याच्या आशीर्वादाने 5 राशीच्या लोकांना धन, सन्मान आणि प्रगती लाभेल. सूर्याच्या कृपेने महिनाभर कोणत्या राशीचे लोक सुख-समृद्धीत राहणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
सूर्याच्या मेष राशीत संक्रमणाने मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. या काळात नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुम्ही तुमच्या कामावर खुश असाल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा देखील चांगला सहवास लाभेल.
वृषभ रास (Taurus)
सूर्याच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांना अनेक शुभ फायदे होणार आहेत. या काळात तुमचा करिअर ग्राफ फार उंचावणार आहे. तुम्हाला नोकरी काही कारणास्तव बदलायची असेल तर तुम्ही तेदेखील करू शकता. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. यात्रेला जाण्याचा चांगला योग आहे.
मिथुन रास (Gemini)
सूर्याचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला काळ घेऊन येणार आहे. काही दिवस तुमचे आव्हानात्मक असतील मात्र त्यानंतर तुमचे सुखाचे दिवस सुरु होतील. व्यापारात तुम्हाला चांगला नफा मिळेल. आरोग्य देखील उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी समोर आलेल्या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं राशी परिवर्तन शुभकारक ठरणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. पण तुम्ही खंबीरपणे सर्व परिस्थितींना सामोरे जाल. तुमच्या तब्येतीत चांगली सुधारणा पाहायला मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
सूर्याच्या संक्रमणाने वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावर फार सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. नोकरीच्या अनेक संधी तुमच्याकडे चालून येतील. या काळात तुमचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाच्या साथीने तुमची सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :