Astrology : 'या' 3 राशींच्या महिला असतात सासूच्या लाडक्या; अगदी जवळच्या मैत्रिणीसारखं असतं नातं
Women Bonding With Mother-In-Laws : जरी आपण सर्वांनी सासू आणि सून यांच्यातील भांडणाबद्दल ऐकलं असेल, तरी काही राशींच्या सुना असतात ज्यांचं त्यांच्या सासूशी चांगलं जमतं आणि दोघी अगदी मैत्रिणींसारख्या राहतात.
Women Bonding With Mother-In-Laws : सनातन धर्माच्या 16 संस्कारांपैकी विवाह हा देखील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. हे केवळ दोन लोकांचेच नाही, तर दोन कुटुंबांचे, मूल्यांचे आणि परंपरांचे एकत्रीकरण आहे. हे असं नातं आहे, ज्यामध्ये दोघांना एकत्र पुढे जायचं आहे. लग्नावेळी पती-पत्नी एकमेकांच्या सुख-दु:खात नेहमी साथ देण्याची शपथ घेतात. लग्नासाठी मुला-मुलीची कुंडली जुळवली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या महिला या विवाहाबद्दल फार भाग्यवान असतात. त्यांचे त्यांच्या सासू-सासऱ्यांशी खूप चांगले जमते आणि अगदी घट्ट नाते असते. या राशींच्या महिला आपल्या सासूसोबत अगदी मैत्रिणीप्रमाणे वागतात. आता या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
या राशीच्या सुनांचे सासूशी चांगले पटते
1. मेष राशीच्या सुना (Aries)
मेष राशीची सून खूप मेहनती आणि मोकळ्या मनाची मानली जाते. ती अनेकदा सासूशी प्रत्येक विषयावर मोकळेपणाने बोलत असते. त्यामुळेच दोघांमध्ये मैत्रिणीसारखे बंध निर्माण झालेले असतात. जेव्हा जेव्हा मेष राशीच्या सुनेला कोणत्याही प्रकारच्या सल्ल्याची आवश्यकता असते, तेव्हा तिची सासू तिला सर्वोत्तम सल्ला देते आणि प्रत्येक वाटेवर ती सूनेला साथ देते.
2. मिथुन राशीच्या सुना (Gemini)
ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या महिलांची रास मिथुन असते, त्यांचे सासू-सासऱ्यांसोबत खूप चांगले संबंध असतात. मिथुन राशीच्या सुना या त्यांच्या सासूच्या प्रिय असतात, त्या त्यांच्या सासू-सासऱ्यांचा खूप आदर करतात. मात्र, दोघांमधील मतभिन्नतेमुळे काही वेळा दोघांमध्ये वाद देखील होऊ शकतो. मिथुन राशीच्या महिला सासूला खूप चांगले ठेवतात, त्यांना काही हवं-नको त्याची विचारपूस देखील करत राहतात.
3. कुंभ राशीच्या सुना (Aquarius)
ज्या महिलांची रास कुंभ आहे, त्या या बाबतीत खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या सुनांच्या सासू खूप शांत स्वभावाच्या असतात, त्या त्यांच्या सुनांवर खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात. सासू आणि सून दोघीही एकमेकांशी सर्व काही शेअर करतात. कुंभ राशीच्या सुनांना सासूची चांगली साथ मिळते, प्रत्येक संकटात दोघी एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: