Astrology : 25 जानेवारीला बनत आहेत तब्बल 5 अद्भूत योग; लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरी आणा 'या' गोष्टी, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
Guru Pushya Yog : हिंदू कॅलेंडरनुसार, 25 जानेवारीला गुरु पुष्य नक्षत्रासह अनेक विशेष योग तयार होत आहेत. या खास दिवशी काही शुभ गोष्टी घरी आणल्या तर लक्ष्मी देवी प्रसन्न होईल.
Guru Pushya Yog 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, 25 जानेवारी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी पौष पौर्णिमेसह अनेक अद्भुत योग तयार होत आहेत. इतके योग अनेक वर्षांनंतर एकत्र तयार होत असल्याचं मानलं जात आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग सोबत गुरु पुष्य योग देखील तयार होत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि चंद्र देवाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. यासोबतच या दिवशी काही गोष्टी घरात आणल्याने व्यक्तीला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. 25 जानेवारीला नेमक्या कोणत्या गोष्टी घरी आणणं शुभ मानलं जातं? जाणून घेऊया.
25 जानेवारीला पौष पौर्णिमा
प्रत्येक महिन्यात अमावस्येनंतर पौर्णिमा येते आणि यासह नवीन महिन्याची सुरुवात होते. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेप्रमाणे पौष महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगास्नानासोबत दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
25 जानेवारीला बनत आहेत अद्भूत योग
हिंदू कॅलेंडरनुसार, 25 जानेवारीला पौष पौर्णिमेसह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवि योग, प्रीति योगासह गुरुपुष्य योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर चालणार आहे. यासोबतच सकाळी 07.13 ते 08.16 पर्यंत रवि योग आहे. यासोबतच गुरुपुष्य आणि अमृत सिद्धी योग 26 जानेवारीला सकाळी 8:16 ते 7:12 पर्यंत आहे.
गुरु पुष्य नक्षत्रादरम्यान खरेदी करा या गोष्टी
चण्याची डाळ
गुरु पुष्य योगाच्या वेळी 25 जानेवारीला तुम्ही हरभरा डाळ खरेदी करू शकता, कारण ती गुरुशी संबंधित आहे. असं केल्याने कुंडलीत बृहस्पतिची स्थिती मजबूत होते, त्यामुळे लक्ष्मी देखील खूप प्रसन्न राहते.
सोने-चांदी
गुरु पुष्य योगात सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सोने-चांदी हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात, यामुळे लक्ष्मी खूप प्रसन्न होते. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करू शकता, यामुळे घरातील संपत्ती वाढेल.
मालमत्ता-गाडी
खरेदीसाठी 25 जानेवारीचा मुहूर्त शुभ आहे. या दिवशी वाहन, घर किंवा कोणत्याही प्रकारची संपत्ती खरेदी करणं खूप फायदेशीर ठरू शकतं.
पूजेशी संबंधित गोष्टी
25 जानेवारी रोजी तुम्ही सिंदूर, अक्षत, धार्मिक पुस्तकं, देवी-देवतांची चित्रं इत्यादी पूजेशी संबंधित वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. याचे शुभ परिणामही तुम्हाला मिळतील.
श्री सूक्ताचे पठण करा
जर या वस्तू खरेदी करता येत नसतील तर तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्री सूक्ताचे पठण करा, असे केल्याने जीवनात तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astro Tips : बेडवर बसून जेवल्याने लक्ष्मी होते नाराज; होतात 'हे' वाईट परिणाम