Mangal Gochar : 24 फेब्रुवारीपासून 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; मंगळ चालणार सरळ चाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ थेट मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि या काळात तो सरळ चालीत असेल, ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशींना सोन्याचे दिवस येऊ शकतात.
Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी चाल बदलत असतात. कधी ग्रह सरळ चालीत असतात, तर कधी वक्री, ज्याचा परिणाम मानवी जीवनासह संपूर्ण पृथ्वीवर दिसून येतो. यातच 24 फेब्रुवारीला ग्रहांचा सेनापती मंगळ सरळ चालीत मार्गस्थ होणार आहे. मिथुन राशीमध्ये मंगळ सरळ चाल चालेल. अशा स्थितीत मंगळ थेट असल्यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं. तसेच, या राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि चांगली प्रगती होऊ शकतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मंगळाची सरळ चाल तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते . कारण मंगळ तुमच्या राशीतून थेट तिसऱ्या घरात जाणार आहे. त्यामुळे तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकतं. तसेच नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील. नवीन नोकरीच्या ऑफर किंवा परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच यावेळी तुम्हाला भावा-बहिणींचं सहकार्य मिळेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाची सरळ चाल शुभ सिद्ध होऊ शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून थेट नवव्या घरात फिरणार आहे. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळवतील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. जुने कौटुंबिक वाद मिटतील. त्याच वेळी, आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान आणि भरपूर संपत्तीही मिळेल. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
सिंह रास (Leo)
मंगळ सरळ चालीत असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या संक्रमण कुंडलीतील उत्पन्न आणि लाभ स्थानी फिरणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच तुम्ही अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि अडकलेला पैसा परत येईल. व्यवसायात भरपूर नफा मिळेल आणि गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच या काळात तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: