Makar Sankranti 2025: 2025 वर्षाची मकर संक्रांती विशेष! वर्षभर तिजोरी धनाने भरलेली राहील, 'असे' 3 खास उपाय, अनेकांना माहीत नाहीत, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Makar Sankranti 2025: तुमचीही तिजोरी वर्षभर भरलेली असावी असे वाटत असेल, तर मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हे 3 खास उपाय करायला विसरू नका. येथे सर्वात सोपा उपाय जाणून घेऊया.
Makar Sankranti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 2025 हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि या नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रात.. मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय पुण्यपूर्ण आणि शुभ मानला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी काही विशेष काम केल्याने व्यक्ती आपले भाग्य बदलते, अशी धारणा आहे. जर तुम्हीही समस्यांनी घेरलेले असाल आणि तुम्हालाही संपत्ती मिळवायची असेल, तसेच तुमचीही तिजोरी वर्षभर भरलेली असावी असे वाटत असेल, तर मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हे 3 खास उपाय करायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात सोपे उपाय जाणून घेऊया...
धनाशी संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर...
धार्मिक मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिवरील रागाचा त्याग करून आपल्या घरी गेले, त्या कारणाने संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य 1000 पटीने वाढते. आणि या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष दूर होतो आणि धनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
जर तुम्हीही समस्यांनी घेरलेले असाल तर...
मकर संक्रांतीचा काळ हा दानधर्मासाठी सर्वोत्तम काळ आहे असे म्हटले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवा शुद्ध तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा लावावा. त्यानंतर उंबरठ्यावर डाव्या बाजूला तिळाचा दिवा आणि उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवावा. त्यानंतर 14 कवड्या घेऊन केशर दुधाने आंघोळ करून गंगाजलाने धुवून शुद्ध करा.
घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी..
आता देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून ॐ संक्रात्याय नमः या मंत्राचा 14 वेळा जप करा. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याच पद्धतीने 2 दिवे लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा ठेवा. असे मानले जाते की, या उपायाने वर्षभर घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
प्रभावी मंत्राचा जप
संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे भांडे शुद्ध पाण्याने भरून त्यात कुंकु, अक्षता, काळे तीळ आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा - ॐ घृणि सूर्याय नम: या मंत्राचा जप करा आणि सूर्य मंत्राचा किमान 501 जप करा. यानंतर पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण करावे.
पितरांकडून समृद्धीचा आशीर्वाद मिळतो..
संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात आणि त्यांना समृद्धीचा आशीर्वाद देतात. तसेच या दिवशी गूळ, तूप, तीळ आणि खिचडी दान करणे खूप शुभ मानले जाते. या 3 उपायांनी घरात सुख-समृद्धी नांदेल आणि वर्षभर घरात धनाचा आशीर्वाद राहील.
मकर संक्रांत कधी आहे?
हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला नसून 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे. सूर्याचं संक्रमण 14 जानेवारी रोजी सकाळी 09 वाजून 03 मिनिटांनी मकर राशीत होणार आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरी करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जाणार आहे.
मकर संक्रांती 2025 शुभ मुहूर्त कधी?
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 09:03 ते 05:46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत आहे. महा पुण्यकाल 1 तास 45 मिनिटांपर्यंत आहे, तर पुण्यकाळ 8 तास 42 मिनिटांपर्यंत आहे.
हेही वाचा>>>
Makar Sankrant 2025: यंदाची मकर संक्रांत एकदम खास! मेष, मकर आणि 'या' राशींचे नशीब चमकणार? आर्थिक संकट होईल दूर, नोकरीत यश अन् बरंच काही..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )