(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या या दिवशी दान करण्याचे महत्त्व
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा दिवस शुभ मानला जातो, या दिवशी तुम्ही चांगली कामं केली तर तुमचे नशीब बदलू शकते. मकर संक्रांतीला उत्तरायण असेही म्हटले जाते, कारण यानंतर सूर्य उत्तर दिशेला जातो.
Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. 2024 मध्ये मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे.
ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितल्याप्रमाणे, ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 02:42 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला उदया तिथी येत आहे, त्यामुळे 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीलाच साजरा केला जात आहे.
मकर संक्रांतीनंतर बदलते वातावरण
ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, मकर संक्रांतीनंतर नद्यांमध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे शरीरातील अनेक रोग दूर होतात. या ऋतूत तीळ आणि गूळ खाणे खूप फायदेशीर आहे, त्यामुळे शरीर उबदार राहते. सूर्याच्या उष्णतेमुळे उत्तरायणात थंडी कमी होते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 15 जानेवारी हा दिवस मकर संक्रांतीने थंडी कमी होण्याची सुरुवात मानली जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी दान करा
मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करणे पुण्याचे मानले जाते. या दिवशी खिचडी दान केल्याने विशेष फळ जाते. या दिवसापासून सर्व शुभ कार्यावरील बंदी देखील संपते. या सणाला खिचडी खाण्याला आणि खिचडी दान करण्याला अत्यंत महत्त्व असल्याचे सांगितले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्लेली खिचडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू होते.
मकर संक्रांतीला तयार होणार रवियोग
ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे, 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी 15 जानेवारीला रवि योग, शतभिषा नक्षत्रात तयार जाईल. या दिवशी वरियान योग देखील दिवसभर राहील. सकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत रवि योग असेल.
मकर संक्रांती पतंग महोत्सव
मकर संक्रांत हा सण 'काईट फेस्टिव्हल' म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी लोक गच्चीवर उभे राहून पतंग उडवतात. मात्र, पतंग उडवण्यामागे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. या थंडीच्या मोसमात सूर्यप्रकाश शरीरासाठी आरोग्यदायी आणि त्वचा आणि हाडांसाठी खूप फायदेशीर असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रांत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व