Astrology : पुढील आठवड्यात मेष आणि मिथुनसह 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; महालक्ष्मी योगाचा मिळणार लाभ
Mahalaxmi Yog : जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महालक्ष्मी योग तयार होणार आहे, याच्या शुभ प्रभावाने 5 राशींचं भाग्य उजळणार आहे. या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Weekly Horoscope 15 To 21 January : पुढील आठवड्यात मंगळ ग्रहाचा उदय होईल, तर दुसरीकडे शुक्र धनु राशीत येऊन मंगळ ग्रहासोबत युती करेल, ज्यामुळे महालक्ष्मी योग निर्माण होईल. नवीन आठवड्याची सुरुवातही मकर संक्रांतीपासून होत असून, सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या या स्थितीमुळे 5 राशींसाठी (Zodiac Signs) हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. या राशींचा समाजात सन्मान वाढेल आणि कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. या 5 भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांच्या जीवनातील अडथळे नवीन आठवड्यात दूर होतील आणि आरोग्यही चांगलं राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारीचा हा आठवडा चांगला राहील, नवीन आठवडा त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरेल. आठवड्याच्या मध्यात गुंतवणुकीतून चांगला नफा होईल आणि अनेक कामं सहज पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन रिलॅक्स राहील आणि मानसिक शांतीही मिळेल. तुम्ही सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्यास उत्सुक असाल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा हा आठवडा शुभ संकेत घेऊन आला आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा अधिक अनुकूल राहील. तुमची जी महत्त्वाची कामं अद्याप होत नव्हती, ती या आठवड्यात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. नशिबाची साथ लाभल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इच्छित यश प्राप्त कराल आणि आर्थिक लाभाच्या शुभ शक्यताही निर्माण होतील. या आठवड्यात तुमची चिंता कमी होईल आणि मुलांची प्रगती पाहून मनही प्रसन्न राहील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या आठवड्यात कामाच्या नवीन संधी मिळतील आणि व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि संपत्तीत वाढ होईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या व्यक्तींना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याच्या आणि इच्छित यश मिळवण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. नोकरदारांना कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी मिळेल आणि उत्पन्नात चांगली वाढ होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे, आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठं यश मिळेल. जर तुम्ही आरोग्याच्या एखाद्या समस्येने त्रस्त असाल, तर या आठवड्यात तुमची तब्येत सुधारेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल. कमिशन, कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टीशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ आहे. ज्यांचे जमीन किंवा इमारतीशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकतो.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा तिसरा आठवडा इच्छित यश घेऊन येईल. नवीन आठवड्यात तुमच्यात आत्मविश्वास भरलेला असेल, ज्यामुळे तुम्ही सर्व कामांबाबत उत्साही असाल. तुम्हाला मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. समाजसेवा किंवा राजकारणाशी संबंधित लोकांमध्ये तुमची चांगली लोकप्रियता वाढेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होईल. दाम्पत्य आणि कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा हा आठवडा शुभ संकेत आणि सौभाग्य घेऊन आला आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुमचा उत्साह आणि आनंद वाढेल. जर तुम्ही कोणत्याही जमीन आणि इमारत मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये गुंतत असाल तर एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही त्या सर्व बाबींपासून मुक्त व्हाल. आधी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे, या काळात व्यववसाय फायदेशीर ठरेल. तुमची लव्ह लाईफ आनंदी राहील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: