Libra Horoscope Today 29 April 2023 : तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल, नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला; राशीभविष्य
Libra Horoscope Today 29 April 2023 : तूळ राशीच्या लोकांना आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल.
Libra Horoscope Today 29 April 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनशैलीच्या वस्तूंकडे कल वाढेल, त्यामुळे जास्त खर्च होईल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना उद्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमचे स्थानही वाढेल. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल
तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांना आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. त्यामुळे बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल अन्यथा घरात वाद होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेने चांगला आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. भविष्याकरता आत्तापासूनच पैसे जमा करण्याचा विचार करा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. तसेच, आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मात्र, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल
आज कुटुंबातील आणखी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. तसेच जोडीदाराचं सहकार्य मिळेल.
आज तूळ राशीचे आरोग्य
तूळ राशीच्या लोकांना आज पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे अनियमित खाण्याच्या सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा.
तूळ राशीसाठी आजचे उपाय
संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पाने स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :