(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cancer March Horoscope 2024 : मार्च महिन्यात नोकरी बदलण्याचा निर्णय ठरेल योग्य, वाहन चालवताना घ्या काळजी, कर्क राशीचं मासिक राशीभविष्य जाणून घ्या
Cancer Monthly Horoscope March 2024: कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा राहील? कर्क राशीच्या मार्चमधील व्यावसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जीवनाबद्दल जाणून घेऊया.
Cancer March Horoscope 2024 : कर्क (Cancer) राशीच्या लोकांसाठी मार्च महिना (Cancer March 2024 Horoscope) संमिश्र परिणाम देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत हा महिना चांगला असला, तरी आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता. विद्यार्थ्यांना या महिन्यात अभ्यासावर जास्त भर देण्याची गरज आहे. गरज नसेल तर प्रवास टाळलेला बरा किंवा पुढील महिन्यात प्रवासाची योजना आखा.
कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल? सविस्तरपणे जाणून घेऊया.
कर्क राशीचे करिअर (Cancer Job Career Horoscope March 2024)
तुमच्या राशीच्या सहाव्या भावात गुरू असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे, असं म्हणता येईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या महिन्यात यश मिळू शकतं. या महिन्यात नोकरी बदलण्याचा निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरेल.
14 मार्चपर्यंत मंगळ सप्तम भावात उच्चस्थानी राहून रुचक योग तयार करेल, यामुळे नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. मात्र, या काळात कामाचा ताणही जास्त राहील.
14 ते 25 मार्च दरम्यान सूर्य-बुध नवव्या भावात बुधादित्य योग निर्माण करतील, हा योग तुमच्यासाठी फलदायी ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या बॉसशी पगारासंदर्भात चर्चा करू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या चांगल्या कामासाठी तुमची प्रशंसा होऊ शकते.
परंतु, 15 मार्चपासून आठव्या भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष निर्माण होत असल्यामुळे तुम्हाला ऑफिसमधील अनावश्यक वादापासून, गॉसिप्सपासून दूर राहावं लागेल. मार्च महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल.
विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope March 2024)
विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासासाठी अधिक वेळ द्यावा लागेल, तरच तुम्हाला चांगले निकाल मिळतील. परंतु, 15 मार्चपासून आठव्या भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष निर्माण होत असल्यामुळे या काळात तुम्ही थोडे आळशी होऊ शकता. जास्त मेहनत न करता चांगले मार्क्स मिळतील, अशी तुमची भावना असेल. महिन्याच्या शेवटी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल असेल आणि अभ्यासातही तुम्ही विशेष यश मिळवू शकता.
कर्क राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Cancer Health And Travel March 2024)
मार्च महिन्यात आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा केल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. 15 मार्चपासून आठव्या भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असल्यामुळे वाहन चालवताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. शनिच्या प्रभावामुळे महत्त्वाचं काम होत नसेल तर ते पुढे ढकला. या महिन्यात एखादा महत्त्वाचा प्रवास पुढे ढकलला तरी बरं राहील.
कर्क राशीसाठी उपाय (Cancer Remedies March 2024)
8 मार्च, महाशिवरात्री :- "ओम रामेश्वराय नमः" चा जप करा. शंकराच्या पिंडीवर चंदन आणि अष्टगंधाचा अभिषेक करा.
24 मार्च, होळी :- होळीच्या दिवशी दहनात 50 ग्रॅम बडीशेप अर्पण करा. दुसऱ्या दिवशी 7 चिमूट होलिका दहन भस्म घरी आणा, यामुळे वाणी दोष दूर होतील आणि अपूर्ण कामं पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: