एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ, चांगल्या पगाराच्या नोकरीसह होणार बक्कळ धनलाभ

Laxmi Narayan Yog : अवघ्या काही दिवसांत मेष राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे, यामुळे मिथुन राशीसह काही राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. या राशींना आर्थिक लाभासोबतच नोकरी आणि व्यवसायात भरघोस यश मिळेल.

Laxmi Narayan Yog : ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार झाला तर त्याला सुख-समृद्धीसोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. अशा व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते. जेव्हा कुंडलीत एकाच घरात शुक्र आणि बुध एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो.

सध्या शुक्र मेष राशीत अस्त स्थितीत आहे, त्याच वेळी 10 मे रोजी ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा दाता असलेला बुध देखील या राशीत प्रवेश करेल. यावेळी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होईल. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होईल, त्यांना व्यवसायात यश मिळेल आणि प्रेमसंबंध देखील चांगले राहतील. लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना (Zodiac Signs) प्रचंड फायदा होईल? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. कुटुंबाची प्रत्येक गरज पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावातून मुक्त होऊ शकता. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याबरोबरच आर्थिक लाभही होऊ शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. भाऊ-बहिणीमध्ये सुरू असलेल्या अडचणी संपतील. यासोबतच तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता आणि तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प, चांगली डील किंवा ऑर्डर मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता, या वेळेत तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही लाभ मिळू शकतो.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या योगामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. यासोबतच बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. नोकरदार लोकांच्या जीवनावरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळवू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. काही मोठ्या प्रकल्पावर किंवा करारांवर स्वाक्षरी होऊ शकते.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत फलदायी ठरेल. या काळात तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने वाहन आणि मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तो सुरू करणं फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यासोबतच तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावा लागू शकतो, यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Jupiter Transit : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना येणार 'अच्छे दिन', धन-संपत्तीत होणार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैदSupriya Sule vs Sunetra Pawar : इंदापुरात सु्प्रिया सुळे - सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सTOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
OTT Movies : वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?
Embed widget