![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Lakshmi Pujan 2022 : आज लक्ष्मीपूजन! दिवाळीत देवी लक्ष्मीला कसे खुश कराल? जाणून घ्या 'या' महत्वाच्या गोष्टी
Lakshmi Pujan 2022 : दिवाळीमध्ये ज्या घरांमध्ये स्वच्छता असते, त्या घरांमध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो
![Lakshmi Pujan 2022 : आज लक्ष्मीपूजन! दिवाळीत देवी लक्ष्मीला कसे खुश कराल? जाणून घ्या 'या' महत्वाच्या गोष्टी Lakshmi Pujan 2022 pujan muhurt deepawali auspicious time of lakshmi pujan marathi news Lakshmi Pujan 2022 : आज लक्ष्मीपूजन! दिवाळीत देवी लक्ष्मीला कसे खुश कराल? जाणून घ्या 'या' महत्वाच्या गोष्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/0990a5ba7e4a237a899f7d79b28e9b421666574947383381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lakshmi Pujan 2022 : हिंदू पंचागानुसार, दिवाळी (Diwali 2022) सण दरवर्षी कार्तिक अमावस्या तिथीला साजरी केली जाते. दिवाळीत अमावस्या तिथीला रात्री गणेश, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी देवी लक्ष्मी (Lakshmi Pujan) आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. या वर्षी, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे.
दिवाळी पूजेसाठी योग्य वेळ कोणती?
24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.53 ते 08.16 पर्यंत असेल. लक्ष्मी पूजनाचा एकूण कालावधी 01 तास 23 मिनिटे आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित पूजा साहित्य घेणे आवश्यक आहे. या दिवशी श्रीयंत्र, कुबेर यंत्राचे पूजन लाभदायक आणि प्रगती देणारे मानले जाते. दिवाळीमध्ये ज्या घरांमध्ये स्वच्छता असते, लक्ष्मीची रोज पूजा केली जाते. त्या घरांमध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो. 24 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी कुबेर पूजा आहे. या निमित्ताने घरोघरी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी वर्ग आज आपल्या हिशोबाच्या वह्या पूजतात. परंतु, लक्ष्मी पूजनाची ठराविक वेळ असते. पंचांगानुसार देण्यात आलेल्या वेळेनुसारच लक्ष्मी पूजन केले जाते.
पूजेचा कालावधी: 1 तास 21 मिनिटे
प्रदोष काल : 17: 43 : 11 ते 20 :16 :07
वृषभ कालावधी : 18: 54: 52 ते 20: 50: 43
दिवाळीत लक्ष्मी पूजनाची पद्धत जाणून घ्या
लक्ष्मीपूजनासाठी प्रथम घरात गंगाजल शिंपडावे. घराच्या मुख्य गेटवर रांगोळी आणि दिवे लावा. पूजेच्या ठिकाणी चौरंग ठेवून त्यावर लाल कपडा पसरवावा. त्यानंतर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवा. पाण्याने भरलेला कलश ठेवा. माता लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्तीसमोर दिवा लावा. नंतर त्यांना हळद -कुंकू लावून, तांदूळ, फळे, गूळ, बत्ताशे इत्यादी अर्पण करा. यासोबतच देवी सरस्वती, देवी काली, भगवान विष्णू आणि कुबेर देव यांची पूजा करा. यानंतर तिजोरीचीही म्हणजेच धनाची पूजा करावी. यानंतर देवाला मिठाई आणि फळे अर्पण करा. देवी लक्ष्मीजींची आरती करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा >
Lakshmi Pujan Muhurat : 'या' वेळेतच करा लक्ष्मी पूजन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)