Ketu Gochar : 10 नोव्हेंबरपासून पालटणार 3 राशींचं नशीब; पापी ग्रह केतूची चाल बदलणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Ketu Nakshatra Parivartan 2024 : केतू लवकरच आपलं नक्षत्र बदलून सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश करेल. याचा सर्वाधिक फायदा 3 राशींना होणार आहे, या राशींच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल.
![Ketu Gochar : 10 नोव्हेंबरपासून पालटणार 3 राशींचं नशीब; पापी ग्रह केतूची चाल बदलणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार Ketu Gochar 2024 Ketu Transit into Surya Uttara Falguni nakshatra these zodiac signs will get lucky bank balance will increase by new job business Ketu Gochar : 10 नोव्हेंबरपासून पालटणार 3 राशींचं नशीब; पापी ग्रह केतूची चाल बदलणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/04/a5683e91edf61a5cb83d42553cd758341730701831879713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ketu Nakshatra Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रात केतू (Ketu) आणि राहू यांना छाया ग्रह मानलं जातं. परंतु त्यांचं अधिक महत्त्व आहे, कारण त्यांच्या स्थितीतील, चालीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. केतू सध्या हस्त नक्षत्रात आहे, पण येत्या 10 तारखेला तो उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. केतू नेहमी उलट्या चालीत फिरतो, ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, केतू 10 नोव्हेंबरला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल आणि 20 जुलै 2025 पर्यंत तो या नक्षत्रात राहील. उत्तरा फाल्गुनी हे आकाशातील 27 नक्षत्रांपैकी 12वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. केतूची उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील उपस्थिती 3 राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी केतूच्या नक्षत्रात होणारा बदल फायदेशीर ठरू शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु केतूच्या दृष्टीमुळे त्याचे परिणाम कमी होऊ शकतात. या काळात तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्यासोबतच तुमच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या मुलांबद्दल थोडे चिंतेत असाल, पण हा ताण कालांतराने कमी होऊ शकतो.
कर्क रास (Cancer)
या राशीच्या लोकांनाही केतूच्या नक्षत्र बदलाचा फायदा होऊ शकतो. केतूने नक्षत्र बदलल्यावर तो मेष राशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे भावा-बहिणींशी संबंध चांगले राहतील. सोशल मीडिया, अध्यात्म, फायनान्स या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. 2025 मध्ये थोडं सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक स्थितीसोबतच आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
सिंह रास (Leo)
केतूच्या नक्षत्रातील बदल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. केतूच्या नक्षत्रातील बदलामुळे तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. तुम्हाला परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. घर, मालमत्ता इत्यादी खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आयात-निर्यातीत खूप फायदा होऊ शकतो. केतूची दृष्टी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यशाबरोबरच भरपूर पैसाही कमावता येईल. 2025 मध्ये थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)