Kendra Yog 2025 : अवघ्या 2 तासांत या 3 राशींचे सुरु होतील 'अच्छे दिन'; बुध ग्रह बनवतोय पॉवरफुल योग, लवकरच पैसा हातात खेळणार
Kendra Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचा हा संयोग 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी होणार आहे. तर, बुद आणि यम ग्रह एकमेकांच्या 90 डिग्रीवर असणार आहे.

Kendra Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) ग्रह जवळपास प्रत्येक 15 दिवसांनी राशी परिवर्तन करणार आहे. अशा प्रकारे एका महिन्यात दोन राशींमध्ये (Zodiac Signs) भ्रमण करतात. यामुळे काही राशींच्या स्थितीत बदल दिसून येतो. हा बदल सर्व 12 राशींवर दिसून येतो. आता अवघ्या काही तासांतच बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी बुध ग्रह 24 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच, या काळात बुध ग्रहाची अन्य ग्रहांबरोबर युती होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचा हा संयोग 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी होणार आहे. तर, बुद आणि यम ग्रह एकमेकांच्या 90 डिग्रीवर असणार आहे. सध्या बुध ग्रह मकर राशीत स्थित आहे. याचा काही राशींवर शुभ परिणाम दिसून येणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध-यमचा केंद्र योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं दिसेल. तसेच, या काळात तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. तुमच्या जीवनात सकारात्मकता दिसून येईल. तसेच, उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात अनेक दिवासांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष राहील. तसेच, देवी लक्ष्मीची देखील तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, मित्रांचा सपोर्ट तुम्हाला मिळेल. भविष्यासाठी तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी बुध-यम केंद्र योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या जीवनात आनंद टिकून राहील. नवीन काहीतरी करण्याची क्षमता तुमच्यामध्ये दिसून येईल. उत्पन्नाच वाढ होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. मित्रांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल. तसेच, लवकरच परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















