एक्स्प्लोर

Karwa Chauth 2023: अविवाहित मुली करवा चौथचं व्रत करू शकतात का? जाणून घ्या व्रताचे नियम

Karwa Chauth 2023: करवा चौथचं व्रत आणि उपवास विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. पण अविवाहित मुली देखील हे व्रत करू शकतात, यासाठी या व्रताचे नियम पाहूया.

Karwa Chauth 2023: करवा चौथचा (Karwa Chauth) दिवस विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. यावेळी 1 नोव्हेंबरला, म्हणजेच आज करवा चौथ साजरा केला जात आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी करवा चौथचा उपवास केला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते.

अविवाहित मुली करवा चौथचं व्रत ठेवू शकतात का?

करवा चौथ व्रत विशेषतः विवाहित महिलांसाठी आहे. पण कुमारिकांनाही हे व्रत करता येईल का? असा प्रश्न अनेकांना पडतो. अविवाहित मुली किंवा ज्यांचं लवकरच लग्न होणार आहे, अशा मुली देखील करवा चौथचं व्रत ठेवू शकतात. या दिवशी उपवास ठेवू शकतात. पण अविवाहित मुली हा उपवास करत असतील तर त्यांना तारे पाहून हा उपवास सोडावा लागतो.

चंद्राऐवजी ताऱ्यांना अर्घ्य देवून सोडावा लागेल उपवास

मुलीचे लग्न होईपर्यंत तिला तारे बघून उपवास सोडावा लागतो. जर अविवाहित मुलींनी करवा चौथच्या दिवशी करवा चौथ उपवास केला तर त्या ताऱ्यांना अर्घ्य देऊन उपवास सोडू शकतात. असं मानलं जातं की केवळ विवाहित महिलाच चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडू शकतात. अविवाहित मुली चंद्राला पाहून उपवास सोडत नाहीत.

करवा चौथच्या दिवशी अविवाहित मुली अनेकदा त्यांचा प्रियकर किंवा भावी जोडीदारासाठी किंवा ज्याच्याशी लग्न ठरलं आहे त्याच्यासाठी उपवास करतात. बर्‍याच वेळा अविवाहित मुली चांगल्या जोडीदारासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि ताऱ्यांना अर्घ्य देऊन उपवास सोडतात.

अविवाहित मुलींसाठी नियम (Karwa Chauth Vrat Rules For Unmarried Girls)

  • जर अविवाहित मुलींनी या दिवशी उपवास केला असेल तर त्यांनी हातावर मेहंदी लावावी.
  • या दिवशी काहीही न खाता किंवा न पिता हे व्रत ठेवा.
  • कुमारिकांनी लाल रंगाचे कपडे घालणं आवश्यक नाही, ते काळा आणि पांढरा वगळता कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात.
  • अविवाहित मुलींना सकाळी सरगी खाणं बंधनकारक नाही.
  • या दिवशी अविवाहित मुली शिव-पार्वतीची पूजा करू शकतात.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kartik Month 2023: सुरू असलेल्या कार्तिक महिन्यात तुळशीला अधिक महत्त्व; रोज तुळशीपूजनाने मिळतील 'हे' लाभ, जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget