(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartik Month 2023: कार्तिक महिन्यात 'हे' उपाय दूर करतील लग्नात येणाऱ्या अडचणी; घरी लवकरच वाजतील सनई-चौघडे
Kartik Maas Upay: जर एखाद्या व्यक्तीने कार्तिक महिन्यात काही ठराविक उपाय अवलंबले तर त्याला त्याच्या कुंडलीतील दोषांपासून मुक्ती मिळते, लग्नाच्या मार्गात येणारे अडथळेही दूर होतात.
Kartik Month 2023: कार्तिक महिना हिंदू धर्मात सर्वात पवित्र महिना मानला जातो. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या महिन्यात जर कोणत्याही व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर त्यांनी काही उपाय केले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या लग्नात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील.
कार्तिक महिन्यात (Kartik Month) हे काही उपाय केल्यास विवाहात येणारे अडथळे तर दूर होतातच, यासोबत कुंडलीतील सर्व प्रकारच्या दोषांपासूनही मुक्ती मिळते. कार्तिक महिन्यात करण्याच्या या खात्रीशीर उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या कालावधीदरम्यान करता येतील हे उपाय?
29 ऑक्टोबरपासून कार्तिक महिना सुरू झाला आहे. 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिना संपणार आहे. कार्तिक महिना संपताच चातुर्मासही संपेल, त्यानंतर लग्नासाठी शुभ मुहूर्त सुरू होईल. म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शेवटपर्यंत, 27 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता.
कार्तिक महिन्यातील पहिला उपाय
या उपायामध्ये व्यक्तीला शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीपासून एकादशीपर्यंत सात दिवस सकाळी लवकर उठावं लागेल. सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर एका व्यासपीठावर लाल रंगाचं कापड पसरून त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर करा. त्यानंतर विष्णुसहस्त्रनामाचा अवश्य पठण करा.
कार्तिक महिन्यातील दुसरा उपाय
मंगळ दोष दूर करण्यासाठी कार्तिक महिन्यात मंगळवारच्या दिवशी काळ्या पाषाणाच्या शिवलिंगावर गंगाजल वाहावं, यानंतर कच्चे दूध, साखरेची मिठाई आणि गुलाबाची फुलं अर्पण करा.
कार्तिक महिन्यातील तिसरा उपाय
कुंडलीतील पितृ दोषही विवाहात अडथळा ठरतो. हा पितृदोष दूर करण्यासाठी कार्तिक महिन्यात संध्याकाळी पिंपळाच्या पानांवर दिवा ठेवावा आणि नदी किंवा तलावात पिंपळाच्या पानावर ठेवलेला दिवा सोडावा.
कार्तिक महिन्यातील चौथा उपाय
कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं, त्यानंतर तुळशीला जल अर्पण करावं. मात्र यादरम्यान, रविवारी तुळशीला पाणी घालू नये हे लक्षात ठेवा.
कार्तिक महिन्यातील पाचवा उपाय
तुळशीविवाह देखील कार्तिक महिन्यात केला जातो. या दिवशी तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करायला विसरू नका आणि तुळशीची पूजा करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Uday : शनिदेव मार्च 2024 पासून पालटणार 'या' 3 राशींचं भाग्य; प्रत्येक दु:खातून करणार मुक्त