Jupiter Transit : 100 वर्षांनतर गुरु-केतू ग्रहांचं संक्रमण, नवपंचम योगाची निर्मिती; 'या' राशींना मिळणार भरपूर पैसा
Jupiter Transit Ketu-Guru Horoscope : केतू आणि गुरु एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या चरणात उपस्थित असून नवपंचम योग निर्माण होतायत.
![Jupiter Transit : 100 वर्षांनतर गुरु-केतू ग्रहांचं संक्रमण, नवपंचम योगाची निर्मिती; 'या' राशींना मिळणार भरपूर पैसा Jupiter Transit Ketu-Guru Horoscope will show their magic after 100 years these zodiac signs will earn lot of money and success in life Jupiter Transit : 100 वर्षांनतर गुरु-केतू ग्रहांचं संक्रमण, नवपंचम योगाची निर्मिती; 'या' राशींना मिळणार भरपूर पैसा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/16ebc7123333b1c86b155cc0ec1f26d91715826797738358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jupiter Transit Ketu-Guru Horoscope : केतू आणि गुरु ग्रहांच्या संक्रमणाचं धार्मिक दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. केतू आणि गुरुच्या चालीमुळे नवपंचम योग (Navpancham Yog) तयार होतोय. हा नवपंचम योग तयार झाल्याने काही राशींचे (Horoscope) चांगले दिवस सुरु होणार आहेत. केतू (Ketu) आणि गुरु (Guru) एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या चरणात उपस्थित असून नवपंचम योग निर्माण होतायत. गुरु आणि केतूच्या संयोगाने कोणत्या राशींचं भाग्य उजळणार ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु आणि केतूची चाल लाभदायक ठरू शकते. नोकरदार वर्गातील लोकांचं या दरम्यान खूप कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी व्यवसायाचे नवीन पर्याय उघडतील. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुम्हाला प्रगतीची शक्यता आहे. या काळात तुम्हाला किरकोळ समस्या उद्भवू शकतात. पण, यामध्ये तुमच्या जोडीदाराची साथ तुमच्याबरोबर असेल. कोणतंही संकट आलं तरी खचून जाऊ नका. याचं कारण केतू आणि गुरु ग्रहांची चांगली साथ तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहून आलेल्या संकटांना सामोरे जा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बृहस्पती आणि केतूची ही चाल फारच चांगली ठरणार आहे. केतू आणि गुरुच्या प्रभावामुळे तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. कोणतंही नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा काळ फार चांगला आहे. तुम्हाला सुख-संपत्तीचा लाभ मिळेल. पण, या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, या काळात तुम्ही मागाल ती इच्छा तुमची पूर्ण होईल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात मित्रांचा सहभाग देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बृहस्पती आणि केतूची चाल फारच फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मित्र आणि बॉस यांचं चांगलं सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला जर नवीन गुंतवणुकीचा विचार करायचा असेल तर तुम्ही ती देखील करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Rajyog 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर जुळून येणार दोन मोठे राजयोग; 'या' 4 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरु, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)