एक्स्प्लोर
Black Thread : 'या' दिवशी काळा धागा बांधल्याने होतात अनेक फायदे
Black Thread : काही लोक दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून काळा धागा बांधतात. काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, तो बांधताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Black Thread : पायात, गळ्यात, हाताला किंवा मनगटात काळे धागे बांधलेल्या अनेक महिला आणि पुरुषांना तुम्ही पाहिले असेल. हा धागा केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील बांधत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर ज्योतिषाचार्य आणि पंडित राजीवजी म्हणतात की, वाईट नजर आणि शनि प्रदोष टाळण्यासाठी काळा धागा घातला जातो. जेणेकरून नकारात्मक शक्ती व्यक्तीपासून दूर राहतील. परंतु, काही लोक असे आहेत जे फॅशन म्हणून काळा धागा बांधकात.
काही लोक दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून काळा धागा बांधतात. काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, तो बांधताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याचा परिणाम चांगला होईल.
- ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी काळा धागा बांधणे खूप शुभ असते.
- काळ्या धाग्यावर नऊ गाठी बांधल्यानंतरच ते परिधान करावा. मंत्रोच्चार करताना काळा धागा धारण करावा.
- काळा धागा बांधल्यानंतर शनिदेवाच्या मंत्राचा किमान 21 वेळा जप करावा.
- मंगळवारी काळा धागा बांधल्याने आर्थिक लाभ होतो. या दिवशी उजव्या पायावर काळा धागा बांधल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
- ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे, त्यांनी पायाच्या बोटाला काळा धागा बांधावा.
- ज्या हातात काळा धागा बांधलेला असेल त्या हातात इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधू नये.
- घराच्या दारात लिंबाचा काळा धागा बांधू शकता जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करू नये.
- घरातील कोणत्याही सदस्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर शनिवारी हनुमानजींच्या पायात काळे धागे गळ्यात सिंदूर लावल्याने रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
- घरामध्ये पैशाची कमतरता असेल तर मंगळवारी उजव्या पायावर काळा धागा बांधावा. पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. जर तुम्हाला इतर लोकांच्या वाईट नजरेपासून दूर राहायचे असेल तर हा धागा हात, पाय, गळ्यात बांधून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या
'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement