Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असणार? 2 राशींना बसणार मोठ्ठा धक्का, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 2 To 8 March 2026 : मार्चचा पहिला आठवडा तूळ ते मीन अशा 6 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 2 To 8 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ते 8 मार्च 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशीबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मार्चचा पहिला आठवडा (Weekly Horoscope) तूळ ते मीन अशा 6 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी मार्चचा पहिला आठवडा मजेशीर असणार आहे. या कालाधीत तुमच्या संपर्कात अनेक लोक येतील. तसेच, जवळचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्यातील निर्णयक्षमता जास्त प्रकर्षाने दिसून येईल. कामाच्या बाबतीत तुम्ही फार फोकस असाल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला सतत प्रवास करावा लागेल. मात्र, तुमचा हा प्रवास सुखकर असेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. या कालावधीत तुमचा सकारात्मक दृष्टीकोन दिसून येईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. या कालावधीत तुम्ही नवीन कामांचा श्रीगणेशा करु शकता. तसेच, महत्त्वाच्या कामांना अधिक वेळ देऊ शकता. एखादी ठरवलेली गोष्ट तुम्ही वेळेत पूर्ण कराल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी शुभकारक असेल. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल. तसेच, नियमितपणे ध्यान आणि योगासन तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. मित्रांचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक असतील. मात्र, जसजसे दिवस सरतील तुमच्यासाठी हा काळ चांगला असेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तसेच, या कालावधीत तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकता. घरातील वातावरण आनंदी असेल. महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. तुमच्यात आज आत्मविश्वास दिसून येईल. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. पैशांच्या बाबतीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी मार्चचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत तुमच्यातील सकारात्मक दृष्टीकोन दिसून येईल. मात्र, तुमच्या संपर्कात असलेल्या लोकांपासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. पैशांच्या बाबतीत जास्त उदारमतवादी राहू नका. कामानिमित्त तुमचे प्रवासाचे योग जुळून येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















