एक्स्प्लोर

Horoscope Today, June 24, 2022 : मेष, मिथुनसह ‘या’ राशींच्या लोकांनी शत्रूंपासून सावध राहा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 24, 2022 : आजचा दिवस सर्व राशींसाठी सामान्य असणार आहेत. मेष राशीच्या लोकांना आज केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

Horoscope Today, June 24, 2022 : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. चंद्र मेष राशीत आहे आणि अश्वनी नक्षत्रात आहे. शनि कुंभ राशीत आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी सामान्य असणार आहेत. मेष राशीच्या लोकांना आज केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज केलेल्या गुंतवणुकीमुळे व्यवसायात फायदा होईल. घराबाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आगामी काळात परिस्थिती अनुकूल राहील. शेजाऱ्यांशी किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित व्यवसायात सावधगिरी बाळगा. कोणताही करार करण्यापूर्वी कागद तपासा.

वृषभ (Taurus Horoscope) : भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक व्हा. तुमची मेहनत तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यात मदत करेल. नातेवाईकांच्या घरी जावे लागेल. बोलताना शब्दांचा योग्य वापर करा. अन्यथा वाद होऊ शकतो. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामात आपला वेळ वाया घालवू नका, कारण कोणतेही नवीन काम सुरू करणे यावेळी सोयीचे नाही. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : शत्रू तुमच्या कामात अडथळा आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, त्यापासून तुम्ही सावध राहावे. कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतो. ऑफिसमध्ये सहकारी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. वादविवाद टाळा, अन्यथा कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. वैयक्तिक समस्यांमुळे भावंडांशी संबंध बिघडू शकतात. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. आपले काही अधिकार कर्मचाऱ्यांना देणे योग्य ठरेल. त्यामुळे कामाचा ताण कमी होईल.

कर्क (Cancer Horoscope) : काही राजकीय आणि सामाजिक संबंध लाभदायक ठरतील. त्यामुळे जनसंपर्क चांगला ठेवा. जुन्या गोष्टींचा वर्तमानावर परिणाम होऊ देऊ नका. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अपेक्षित निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांची निराशा होईल. काही महत्त्वाचे काम हाती येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.  व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासह खरेदीला जाऊ शकता.

सिंह (Leo Horoscope) : अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सावधगिरी बाळगा, गोपनीय गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. एखाद्या खास व्यक्तीशी संवाद होईल. सध्याची परिस्थिती फारशी अनुकूल नाही, त्यामुळे धीर धरा. वैयक्तिक कामामुळे व्यावसायिक कामात लक्ष कमी राहील. त्यामुळे आता नवीन योजना राबवू नका. जे सरकारी नोकरीत आहेत, त्यांना अधिकाऱ्याकडून शाबासकी मिळू शकते आणि जर तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला नवीन पदही सोपवले जाऊ शकते.

कन्या (Virgo Horoscope) : तुमच्या वागण्यामुळे घरात गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहन कर्ज घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. नवीन काम सुरू होईल पण, लगेच लाभ मिळणार नाही. घर आणि व्यवसायात सामंजस्यामुळे दोन्ही ठिकाणी आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन करता येईल. कोणतेही काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. या राशीच्या विवाहितांना सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा.

तूळ (Libra Horoscope) : घरातील मोठ्यांचा आदर करा. व्यापार क्षेत्रात सुरू असलेल्या अडचणीत थोडा दिलासा मिळेल. काम करण्याच्या नवीन पद्धतीमुळे यश मिळेल. कार्यालयातील कोणत्याही महत्त्वाच्या बैठकीत तुमच्या सूचनेला प्राधान्य दिले जाईल. पती-पत्नीचे नाते सौहार्दपूर्ण राहील. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांच्या मदतीने नोकरीत प्रगती होऊ शकते. जीवनसाथीमुळे मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : गुंतवणुकीशी संबंधित कामे पूर्ण होतील. सर्वात कठीण काम पूर्ण करण्यास देखील  तुम्ही सक्षम असाल. जवळच्या व्यक्तीशी संबंधित अप्रिय बातम्यांमुळे दुःखी होऊ शकता. यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. करिअरशी संबंधित एखादे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सरकारी कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. शैक्षणिक कार्यासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. सावध राहा शत्रू विश्वासघात करू शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : आज एखादी मोठी समस्या सुटू शकते. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता. इतर लोकांच्या बाबतीत निरुपयोगी सल्ला देऊ नका. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. अति अहंकारामुळे नोकरी खराब होऊ शकते. फोनवरील कोणतेही महत्त्वाचे संभाषण फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहार टाळा. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील. यामुळे घरातील वातावरण बिघडेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे.

मकर (Capricorn Horoscope) : दिवसाच्या सुरुवातीला अनावश्यक धावपळ होईल. आहाराकडे लक्ष द्या, आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. एखाद्याला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. शैक्षणिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात, सहकाऱ्यांसोबत तणावाची परिस्थिती उद्भवली तरीही, शांत राहणेच चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वारंवार व्यत्ययांमुळे वातावरण बिघडू शकते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : बँक किंवा गुंतवणुकीशी संबंधित काम बिघडू शकते. संयम आणि चिकाटीने काम करा. मौजमजा करणे तरुणांना नुकसान पोहोचवू शकते. कठोर परिश्रम आणि समर्पणाने, तुम्हाला तुमचे इच्छित ध्येय प्राप्त होईल. भागीदारी व्यवसायात संबंध टिकून राहतील. कौटुंबिक संबंध सौहार्दाचे राहतील. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण दौ देऊ नका. कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. वाणीवर संयम ठेवा. मादक पदार्थांपासून दूर राहा. मंगल कार्यात सहभागी होऊ शकता.

मीन (Pisces Horoscope) : आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. पालकांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात मंगल कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. आत्मनिरीक्षण करून तुमचे व्यक्तिमत्व सुधारा. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल नाही. अनावश्यक खर्च टाळा. अधिक मेहनत करावी लागेल. लवकरच तुमची स्वप्ने पूर्ण होतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवाल, अन्यथा परस्पर संबंध बिघडू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget