(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 9 September 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 9 September 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 9 September 2023 : आज शनिवार हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज वृश्चिक राशीच्या लोकांच्या कामात वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. तुम्हाला सर्जनशील कार्यात पूर्ण रस असेल. तर, सिंह राशीच्या लोकांना आपल्या कामात सतर्क राहावे लागेल. एकूणच, मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असणार आहे? काय असतील तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. व्यवसाय करणारे लोक आपल्या व्यवसायात काही नवीन उपकरणे समाविष्ट करू शकतात, ज्यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. आज तुमची चंचलता फार दिसेल. अभ्यासात मन रमणार नाही. तुमचे काही विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचे आरोग्य सामान्य राहील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला अध्यात्मिक कार्यात सहभागी होऊन नाव कमावण्याची संधी मिळेल. तसेच, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे पद मिळू शकते. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी येऊ शकतो. तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल. कुटुंबीयांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी आज जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे तुमचे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. मात्र, असे न करता आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरदार वर्गाला आज त्यांच्या इच्छेनुसार काम मिळाल्यास ते खूप आनंदी दिसतील. कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या तुम्ही वेळेत पार पाडाल. तुम्ही तुमच्या कामात काही बदल केलेत तर ते तुमच्यासाठी चांगले राहतील. नवीन वाहन घेण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. त्यामुळे दिवसभर ते उत्साही राहतील. आज कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देतील. पण, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या मुलासाठी नवनवीन भेटवस्तू आणू शकता.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संघर्षाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात सतर्क राहावे लागेल. तसेच, तुमच्या तब्येतीत काही किरकोळ समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि कामात उशीर करू नका. एखाद्याबरोबर भागीदारीत व्यवसाय केल्याने तुम्हाला काही नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमचे कोणतेही काम उद्यासाठी पुढे ढकलले तर ते तुमच्यासाठी नंतर अडचणी निर्माण करू शकते. काही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतागुंतीचा असणार आहे. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कोणतेही महत्त्वाचे काम मागे पडू देऊ नका, अन्यथा समस्या वाढू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित लाभ न मिळाल्याने तुम्ही थोडे चिंतेत राहाल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते दूर होतील. तुम्ही लहान मुलांबरोबर थोडा वेळ मजेत घालवाल आणि काही व्यावसायिक कामासाठी तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांनी भरलेला असणार आहे. तुम्हाला तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या पालकांना सांगण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. अशा वेळी शांत राहून कामावर नीट लक्ष केंद्रित करा. तुमच्या जमिनीच्या मालमत्तेशी संबंधित कोणतीही बाब तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत होती, तर तीही आज दूर होईल आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. कामात तुमची प्रगती होईल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील, परंतु तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करा. तुमच्या मुलाच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. तुम्हाला भविष्यासाठी काही गुंतवणूक करावी लागेल, तरच तुमची सर्व कामे पूर्ण होतील. आज मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज काही गोष्टी शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घेण्याचा असेल. जर तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बऱ्याच काळापासून चिंतेत होता, तर आज तुमची चिंता देखील दूर होईल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात तुम्हाला काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळेल आणि तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि तुमच्या कामाची प्रगती होईल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुम्हाला उत्पन्नाच्या काही स्त्रोतांमधून उत्पन्न देखील मिळेल आणि तुम्हाला खूप विचारपूर्वक पैसे गुंतवावे लागतील. तुम्हाला नवीन डील फायनल करण्याची संधी मिळेल. परंतु, काही विरोधक ते थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, जे तुम्हाला टाळावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :